अहमदाबाद : गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलच्या तडाखेबाज खेळीवर टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग देखील फिदा झाला आहे. सेहवागनं ट्विट करत शुभमनचं कौतूक केलं आहे. चार सामन्यात केलेल्या तीन शतकी खेळी म्हणजे त्याच्यातील धावांची भूक दाखवून देते, अशा शब्दांत सेहवागनं त्याच्या खेळीचं कौतुक केलं आहे. (IPL 2023 Virendra Sehwag became fan on Shubhman Gill brilliant innings)
सेहवागनं ट्वीट करत म्हटलं, "काय खेळाडू आहे, 4 सामन्यात तिसरं शतक आणि काही चित्तथरारक शॉट्स. अप्रतिम सातत्य आणि धावांची भूक, मोठे खेळाडू ज्या प्रकारची खेळी करतात त्याप्रमाणं शुभमनची तडाखेबाज खेळी"
शुभमन गिल एकटाच भिडला!
गुजरात टायटन्सचे शतक 12व्या षटकात धाव फलकावर लावल्यानंतर शुभमन गिलने आपल्या इनिंगचा 5 वा गिअर टाकला. त्यानं गेल्या सामन्यातील स्टार आकाश माधवाल, अनुभवी पियुष चावला यांचा खरपूस समाचार घेत षटकारांची बरसात केली. दुसऱ्याच षटकात 21 आणि 13 व्या षटकात 20 धावा चोपत संघाला 15 व्या षटकात 150 धावांपर्यंत पोहचवलं. शुभमन गिलनं 49 चेंडूत आपलं शतक पूर्ण करत हंगामातील तिसरे शतकही ठोकलं. यामध्ये 8 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.