IPL 2023 Awards List : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात सीएसकेने गुजरातचा 5 गडी राखून पराभव करून पाचव्यांदा चॅम्पियन बनले. हा सामना संपल्यानंतर आयपीएलच्या या मोसमात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार देण्यात आला. यशस्वी जैस्वालने या मोसमात आपल्या संघासाठी 14 सामन्यांत 625 धावा केल्या आहेत.
आयपीएल 2023 मध्ये गुजरातचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने धडाकेबाज फलंदाजी करत 17 सामन्यांमध्ये सर्वाधिक 890 धावा केल्या. तो या मोसमाचा ऑरेंज कॅप विजेता तसेच त्याला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा किताबही देण्यात आला होता.
गिलने हे विजेतेपद पटकावल्यानंतर सांगितले की, माझ्यासाठी याचा खूप अर्थ आहे आणि माझी मेहनत योग्य दिशेने जात आहे. आम्ही अंतिम सामना जिंकलो नाही, पण चांगली सुरुवात करणे महत्त्वाचे होते आणि मी ते केले. यावेळी मी 40-50 स्कोअरचे मोठ्या स्कोअरमध्ये रूपांतर करू शकलो.
मोहम्मद शमीने या मोसमात सर्वाधिक 28 विकेट घेतल्या आणि त्याला पर्पल कॅपचा किताब मिळाला. रशीद खानला कॅच ऑफ द सीझनचा किताब मिळाला. त्याने लखनौविरुद्ध काईल मायर्सचा सर्वोत्तम झेल पकडला. दिल्ली कॅपिटल्सला फेअर प्ले अवॉर्ड देण्यात आला आहे.
जाणून घ्या कोणत्या खेळाडूला मिळाले कोणते विजेतेपद
डेव्हॉन कॉनवे - सामनावीर (अंतिम सामन्यासाठी)
यशस्वी जैस्वाल - इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन
शुभमन गिल - मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीजन
शुभमन गिल - ऑरेंज कॅप (890 धावा)
मोहम्मद शमी - पर्पल कॅप (28 विकेट)
राशिद खान - कॅच ऑफ द सीझन
दिल्ली कॅपिटल्स - फेअर प्ले अवॉर्ड
CSK - विजेता
गुजरात टायटन्स - उपविजेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.