Yashasvi Jaiswal IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने खूप प्रभावित केले. पंजाब किंग्जच्या प्लेऑफच्या शर्यतीतील महत्त्वाच्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. त्याने 36 चेंडूत 50 धावा केल्या. या खेळीत त्याने इतिहास रचला.
अनकॅप्ड खेळाडू म्हणून तो एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शॉन मार्शचा विक्रम मोडला. मार्शने हा विक्रम 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात पंजाब किंग्ज कडून खेळताना केला होता.
पहिल्या हंगामात शॉन मार्शने 616 धावा केल्या होत्या. यशस्वीने 14 सामन्यांत 48.08 च्या सरासरीने आणि 163.61 च्या स्ट्राईक रेटने 625 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. IPL मोसमात 600 धावा करणारा यशस्वी हा 25 वर्षांखालील चौथा फलंदाज ठरला.
या यादीत एकच विदेशी खेळाडू आहे. शॉन मार्श व्यतिरिक्त ऋषभ पंतने 2018 मध्ये 684 धावा केल्या होत्या आणि ऋतुराज गायकवाडने 2021 मध्ये 635 धावा केल्या होत्या. पंत आणि जैस्वाल यांनी 22 वर्षांचे होण्यापूर्वी ही कामगिरी केली.
यशस्वी जैस्वालनेही या मोसमात शतक झळकावले आहे. त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध 124 धावांची खेळी खेळली. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याचे घरचे मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवर त्याने ही खेळी खेळली. या मोसमात सर्वाधिक अर्धशतके करणारा तो संयुक्त तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने 5 अर्धशतके केली आहेत.
यशस्वी जैस्वालने या मोसमात आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या केली आहे. त्याने मुंबईविरुद्ध 62 चेंडूत 124 धावा केल्या होत्या. 16 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याने 26 षटकार मारले आहेत. जास्तीत जास्त त्याने 82 चौकार मारले आहेत. शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 62 चौकार मारले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.