IPL 2024 : ठाकुर बहुत नाइंसाफी...जागा 77... खेळाडू 1166...! पहा लिलावात कोणत्या खेळाडूंची किती आहे 'बेस प्राईज'

IPL 2024 : ठाकुर बहुत नाइंसाफी...जागा 77... खेळाडू 1166...! पहा लिलावात कोणत्या खेळाडूंची किती आहे 'बेस प्राईज'
Updated on

IPL 2024 Auction Full list : सर्व संघ आयपीएल 2024 साठी आपापल्या कोणत्या खेळाडूला घ्यायचं आणि कोणत्या खेळाडूला नाही यांचा प्लॅन करण्यात व्यस्त आहे. यंदाचा आयपीएल लिलाव 19 डिसेंबर 2023 ला दुबईमध्ये रंगणार आहे. वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर फ्रँचायझींनी नक्कीच लक्ष ठेवले असणार आहे. आयपीएलने मागील शुक्रवारी आगामी हंगामासाठी 1166 खेळाडूंची एक लांबलचक यादी शेअर केली, ज्यांनी लिलावासाठी त्यांची नावे दिली आहेत.

आयपीएलने दिलेल्या यादीत बाहेरील देशातील 45 खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय 909 अनकॅप्ड खेळाडूंची नावे असून त्यापैकी 812 भारतीय आहेत. या यादीत 18 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएल 2024 मध्ये 10 फ्रँचायझी सहभागी होत आहेत, ज्यांना 77 स्लॉट भरायचे आहेत. यापैकी 30 स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी असू शकतात. त्याच वेळी, जर आपण फ्रेंचायझींच्या एकूण पर्सबद्दल बोललो तर लिलावासाठी एकूण रक्कम 262.95 कोटी रुपये असेल.

2 कोटी रुपये मूळ किंमत असलेले खेळाडू

हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव, मुजीब उर रहमान, शॉन अॅबॉट, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, मुस्तफिजूर रहमान, टॉम बॅंटन, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, लॉकी फर्ग्युसन, जेराल्ड कोएत्झी, रिले रॉसौ, रॅसी व्हॅन डर डुसेन, अँजेलो मॅथ्यूज.

1.5 कोटींची मूळ किंमत असलेले खेळाडू

मोहम्मद नबी, मॉइसेस हेन्रिक्स, ख्रिस लिन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, डॅनियल वॉरॉल, टॉम कुरन, मर्चंट डी लँग, ख्रिस जॉर्डन, डेविड मलान, टायमल मिल्स, फिल सॉल्ट, कोरी अँडरसन, कॉलिन मुनरो, जिमी नीशम, टीम साउदी, कॉलिन इंग्राम, वानिंदू हसरंगा, जेसन होल्डर, शेरफेन रदरफोर्ड.

1 कोटी रुपये मूळ किंमत असलेले खेळाडू

अॅश्टन आगर, रिले मेरेडिथ, डी'आर्सी शॉर्ट, अॅश्टन टर्नर, गुस ऍटकिन्सन, सॅम बिलिंग्स, मायकेल ब्रेसवेल, मार्टिन गुप्टिल, काइल जेमिसन, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, वेन पारनेल, डेवाल्ड प्रिटोरियस, अल्झारी जोसेफ, रोव्हमन पॉवेल, डेव्हिड विज़.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.