IPL 2024, DC vs LSG : आयुष बडोनी अन् अर्शद खानने रचला नवा इतिहास, 10 वर्षांपूर्वीच्या त्या विक्रमाला दिला धक्का

शुक्रवारी (१२ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आपला दुसरा विजय मिळवला आहे. या सामन्यात दिल्लीने लखनौला ६ विकेट्सने पराभूत केले. तसेच सामन्यादरम्यान लखनौच्या आयुष बडोनी आणि अर्शद खान यांनी एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.
ayush badoni and arshad khan
ayush badoni and arshad khansakal
Updated on

IPL 2024 : शुक्रवारी (१२ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आपला दुसरा विजय मिळवला आहे. या सामन्यात दिल्लीने लखनौला ६ विकेट्सने पराभूत केले. तसेच सामन्यादरम्यान लखनौच्या आयुष बडोनी आणि अर्शद खान यांनी एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

लखनौकडून फलंदाजीमध्ये कर्णधार केएल राहूल, आयुष बडोनी आणि अर्शद खान यांच्याशिवाय कोणालाही काही खास कामगिरी करता आली नाही. लखनौ संघाने ९४ धावांवर ७ विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे लखनौला चांगल्या भागिदारीची गरज होती, जी आयुष आणि अर्शदने पूर्ण केली.

आयुष आणि अर्शद मैदानात उतरले, तेव्हा संघाची धावांसाठी धडपड सुरु होती. लखनौ संघाला १२० पेक्षा जास्त धावा करता येणार नाहीत असं सर्वांना वाटत होतं, परंतु या दोन खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आठव्या विकेटसाठी ७३ धावांची नाबाद भागिदारी केली.

बडोनी- अर्शदने केला विक्रम

आयपीएल इतिहासात आठव्या विकेटसाठी आत्तापर्यंत एवढी मोठी भागिदारी कधीच झालेली नाही. यापूर्वी २०१४ साली जेम्स फाॅकनर आणि ब्रॅड हाॅज या राजस्थानच्या जोडीने मुंबई इंडियन्सविरुद्ध आठव्या विकेटसाठी ४१ चेंडूत ६९ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडत आयुष आणि अर्शदने लखनौसाठी ४२ चेंडूत ७३ धावा केल्या आहेत.

बडोनीने या सामन्यात ३५ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५५ धावा केल्या आहेत. तर अर्शदने १६ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने २० धावा केल्या. संघाला १६७ धावा करुन देण्यात या दोन खेळाडूंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

ayush badoni and arshad khan
GT vs LSG : कोण आहे Ayush Badoni, ज्यानं राशिदला केलं हतबल

दिल्लीचा दुसरा विजय

दिल्ली कॅपिटल्सने लखनौला पराभूत करुन लखनौचा विजयरथ थांबवला आहे. लखनौ ५ सामन्यांपैकी ३ सामन्यात यश मिळवत संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सने आत्तापर्यंत ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी ४ सामन्यात संघाला विजय मिळवण्यात अपयश तर दोन सामन्यात संघाला यश आले आहे. दिल्ली संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे.

लखनौ सुपर जायंट्स आपला पुढचा सामना १४ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध इडन गार्डन येथे खेळणार आहे, तर दिल्ली कॅपिटल्सची पुढची लढत १७ एप्रिलला गुजरात टायटन्सविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.