IPL 2024 CSK : धोनीची डोकेदुखी वाढली! चेन्नईच्या 'बेबी मलिंगा'ला झाली दुखापती, हंगामातून जाणार बाहेर?

आयपीएल 2024 सुरू होण्यास अजून काही दिवस बाकी आहे यादरम्यान......
Matheesha Pathirana Injury Update CSK IPL 2024 Marathi News
Matheesha Pathirana Injury Update CSK IPL 2024 Marathi Newssakal
Updated on

Matheesha Pathirana Injury Update CSK IPL 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्यास अजून काही दिवस बाकी आहे. यादरम्यान काही खेळाडूंना दुखापतही होत आहे, त्यामुळे फ्रँचायझीची डोकेदुखी वाढली आहे.

आता या दुखापतच्या यादीत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाचे नावही जोडले गेले आहे, त्यामुळे गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या मोठा धक्का बसला आहे. पाथीरानाला डाव्या पायात दुखापत झाली असून बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात तो निवडीसाठी उपलब्ध होणार नाही.

Matheesha Pathirana Injury Update CSK IPL 2024 Marathi News
World Olympic Boxing Qualifiers : भारताच्या निशांत देवचा दमदार पंच; जागतिक ऑलिंपिक पात्रता फेरीत आगेकूच

सहा मार्च रोजी खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याला डाव्या पायाला दुखापत झाली. त्या सामन्यात लंकेला 8 विकेटने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पाथिरानाने 3.4 षटके टाकली, ज्यात त्याने 28 धावा देत दोन गडी बाद केल्या.

Matheesha Pathirana Injury Update CSK IPL 2024 Marathi News
IND vs ENG : रोहित शर्मा - शुभमनची शतके; अडीचशे धावांच्या आघाडीसह भारताची सामन्यावर मजबूत पकड

श्रीलंका क्रिकेटने पुष्टी केली की, मथिशा पाथिराना दुखापतीमुळे तिसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मथिशा पाथिराना तिसऱ्या टी-20 मध्ये निवडीसाठी उपलब्ध होणार नाही, कारण खेळाडूच्या डाव्या पायाला ग्रेड 1 हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात गोलंदाजी करताना पाथिरानाला दुखापत झाली होती.

Matheesha Pathirana Injury Update CSK IPL 2024 Marathi News
Nz vs Aus Test : ऑस्ट्रेलियाने गाजवला दिवस! जॉश हॅझलवूडचा प्रभावी मारा; न्यूझीलंडचा डाव १६२ धावांवरच आटोपला

चेन्नई सुपर किंग्जला आशा असेल की मथिशा पाथिरानाची दुखापत फारशी गंभीर नसले. आणि तो आगामी आयपीएल हंगामासाठी सुरुवातीपासून उपलब्ध असले. गेल्या हंगामात त्याने 8 च्या इकॉनॉमीसह 12 सामन्यात 19 विकेट घेत CSK च्या विजेतेपद मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()