IPL 2024 : मॅचच्या एक दिवस आधी CSKला मोठा धक्का! धोनीचा हुकमी एक्का इतक्या सामन्यातून बाहेर

IPL 2024 CSK Pacer Matheesha Pathirana : आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयारीही पूर्ण केली आहे.
IPL 2024 CSK Pacer Matheesha Pathirana Marathi News
IPL 2024 CSK Pacer Matheesha Pathirana Marathi Newssakal
Updated on

IPL 2024 CSK Pacer Matheesha Pathirana : आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयारीही पूर्ण केली आहे. सामन्याच्या एक दिवस आधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला मोठा धक्का बसला.

टीम श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात या 21 वर्षीय गोलंदाजाला दुखापत झाली आणि तो आपला स्पेलही पूर्ण करू शकला नाही.

IPL 2024 CSK Pacer Matheesha Pathirana Marathi News
IPL 2024 CSK Playing 11 : घरच्या मैदानावर MS धोनीसमोर RCB चे कडवे आव्हान; पहिल्या सामन्यात 'या' खेळाडूंना मिळणार संधी?

दुखापतीमुळे पथिराना बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातूनही बाहेर होता आणि तेव्हापासून तो श्रीलंका क्रिकेट (SLC) च्या फिजिओसोबत पुनर्वसन करत आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, एसएलसीकडून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतरच पाथीराना सीएसके संघात सामील होऊ शकणार असल्याचे समजते.

पाथिरानाची दुखापत हा गतविजेत्यासाठी मोठा धक्का आहे. कारण आधीच न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे बाहेर गेला आहे. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे कॉनवे मेपर्यंत मैदानाबाहेर राहणार आहे.

IPL 2024 CSK Pacer Matheesha Pathirana Marathi News
Saeed Ahmed Died : क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! माजी कर्णधारने घेतला जगाचा निरोप

आयपीएलच्या गेल्या हंगामात पाथीरानाने खूप प्रभावित केले होते. डेथ ओव्हरमध्ये पाथिरानाचा इकॉनॉमी रेट 8.00 होता. आणि त्याने 12 सामन्यात 18 विकेट घेतल्या होत्या.

पाथिरानाच्या अनुपस्थितीत बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला संधी मिळू शकते. डेथ ओव्हर्समध्ये मुस्तफिझूर संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मुस्तफिझूरलाही दुखापत झाली आणि त्याला स्ट्रेचर वापरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

पण तो लवकरच बरा झाला आणि चेन्नई कॅम्पमध्ये सामील झाला. आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी मुस्तफिझूर उपलब्ध असेल. चेपॉकमधील खेळपट्टी वळणदार ठरली तर CSK कडे मोईन अलीसह मुस्तफिझूरचा समावेश करण्याचा पर्याय असू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.