IPL 2024 CSK vs GT : फक्त कर्णधार बदला... खेळ नाही... 'प्रिन्स'वर भारी पडला चेन्नईचा ऋतु'राज', CSK चा सलग दुसरा विजय

Chennai Super Kings vs Gujarat Titans Scorecard Updates News : आयपीएल 2024 मध्ये दररोज एकापेक्षा एक अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. आज हंगामाचा सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला आहे.
CSK beat GT by 63 runs News Marathi
CSK beat GT by 63 runs News Marathisakal
Updated on

Chennai Super Kings vs Gujarat Titans Scorecard Updates : आयपीएल 2024 च्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा एकतर्फी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 206 धावा केल्या, प्रत्युत्तरात गुजरात संघाला निर्धारित 20 षटकात केवळ 143 धावा करता आल्या.

गुजरातसाठी ना कर्णधार शुभमन गिलची बॅट कामी आली, ना डेव्हिड मिलर संघाला वाचवू शकला. फक्त साई सुदर्शनने 37 धावा केल्या. दीपक चहर आणि तुषार देशपांडे यांनी 2-2 विकेट घेतल्या आणि दोघांचा इकॉनॉमी रेट प्रति सहा धावांपेक्षा कमी होता.

या विजयासह ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघ चार गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. सीएसकेचा पुढील सामना 31 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. त्याचवेळी गुजरातचा पुढील सामना 31 मार्च रोजी अहमदाबादमध्ये सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.

IPL 2024 CSK vs GT Live Score :चेन्नईने मोठ्या विजयाकडे वाटचाल... गिलच्या संघाला मोठा धक्का!

गुजरातला 17व्या षटकात 121 धावांवर सातवा धक्का बसला. मुस्तफिजुर रहमानने रशीद खानला रचिनकरवी झेलबाद केले. त्याला एक धाव करता आली. 17 षटकांनंतर गुजरातची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात 121 धावा आहे.

IPL 2024 CSK vs GT Live Score : धोनीची जादू... गुजरातला 55 धावांवर तिसरा धक्का!

आठ षटकांनंतर गुजरातने तीन गडी गमावून ५७ धावा केल्या आहेत. सध्या साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर क्रीजवर आहेत. आठव्या षटकात डॅरिल मिशेलने विजय शंकरला यष्टिरक्षक धोनीकरवी झेलबाद केले. माहीने डायव्हिंग करत अप्रतिम झेल घेतला. त्याला 12 धावा करता आल्या.

IPL 2024 CSK vs GT Live Score : 34 धावांवर गुजरातला दुसरा धक्का! चहरने कर्णधारनंतर साहाला पाठवले पॅव्हेलियनमध्ये

IPL 2024 CSK vs GT Live Score : 28 धावांवर गुजरातला पहिला धक्का! चहरने कर्णधारला पाठवले पॅव्हेलियनमध्ये

तिसऱ्या षटकात दीपक चहरने गुजरात टायटन्सला पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार शुभमन गिलला एलबीडब्ल्यू आऊट केले. शुभमन पाच चेंडूत आठ धावा करून बाद झाला. चहरने आयपीएलमध्ये चौथ्यांदा शुभमनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

IPL 2024 CSK vs GT Live Score : शिवम दुबेचे तुफानी अर्धशतक, यूपीचा समीर चमकला! चेन्नईने गुजरातला दिले 207 धावांचे लक्ष्य

चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्ससमोर 207 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकात 6 गडी गमावून 206 धावा केल्या.

शिवम दुबेने 23 चेंडूत 51 धावांची तुफानी खेळी केली. तर, यूपीच्या समीर रिझवीने सहा चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने 14 धावा केल्या. मात्र, त्याने हे दोन्ही षटकार सध्याच्या जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज राशिद खानच्या चेंडूवर मारले. समीरने आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर फाइन लेगवर षटकार ठोकला.

त्याचवेळी ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनीही शानदार खेळी केली, पण अर्धशतक हुकले.

शिवम दुबे अर्धशतक करून आऊट

184 धावांवर चेन्नई सुपर किंग्जला चौथा धक्का बसला. राशिद खानने शिवम दुबेला झेलबाद केले. 23 चेंडूत 51 धावा करून तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि पाच षटकार मारले.

त्याने 22 चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले. यानंतर यूपीचा समीर रिझवी आला आणि त्याने आयपीएलच्या पहिल्याच चेंडूवर रशीदला षटकार ठोकला. यानंतर त्याने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर षटकारही ठोकला. 19 षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 198 धावा आहे.

IPL 2024 CSK vs GT Live Score : कर्णधार म्हणून ऋतुराजचे हुकले पहिले अर्धशतक...  

चेन्नई सुपर किंग्जला 13व्या षटकात 127 धावांवर तिसरा धक्का बसला. स्पेन्सर जॉन्सनने कर्णधार ऋतुराज गायकवाडला आऊट केले. ऋतुराजचे कर्णधार म्हणून पहिले अर्धशतक हुकले. तो 36 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 46 धावा करून बाद झाला.

13 षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 128 धावा आहे.

IPL 2024 CSK vs GT Live Score : चेन्नई सुपर किंग्जला दुसरा धक्का! पण शिवमचा तांडव सुरू

चेन्नई सुपर किंग्जला 11व्या षटकात 104 धावांवर दुसरा धक्का बसला. साई किशोरने अजिंक्य रहाणेला आऊट केले. त्याला 12 चेंडूत 12 धावा करता आल्या. सध्या कर्णधार गायकवाड आणि शिवम दुबे क्रीजवर आहेत. शिवम मैदानावर येताच त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.

IPL 2024 CSK vs GT Live Score : रचिन रवींद्रचं वादळ अर्ध्या तासाने थांबलं! 20 बॉलमध्ये ठोकल्या इतक्या धावा

चेन्नई सुपर किंग्जने 62 धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट गमावली. रचिन रवींद्र 20 चेंडूत 46 धावांची खेळी करून बाद झाला. यादरम्यान त्याने सहा चौकार आणि तीन षटकार मारले.

IPL 2024 CSK vs GT Live Score :  CSK च्या संघात एक मोठा बदल; जाणून घ्या प्लेइंग-११

गुजरातचे प्लेइंग इलेव्हन - शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा, साई सुदर्शन, अजमतुल्ला ओमरझाई, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, आर साई किशोर, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन.

चेन्नईचा प्लेइंग इलेव्हन- रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरेल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चहर, तुषार देशपांडे, पाथीराना, मुस्तिफिजुर रहमान.

IPL 2024 CSK vs GT Live Score : गुजरात टायटन्सने जिंकली नाणेफेक! घेतला 'हा' निर्णय

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शुभमनने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी, ऋतुराजने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. महेश तिक्षीनाच्या जागी मथिशा पाथीराना परतली आहे.

IPL 2024 CSK vs GT Live Score : पहिला सामना जिंकल्यानंतर दोन्ही युवा कर्णधारची खरी कसोटी! किती वाजता होणार टॉस?

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. त्याचवेळी, या सामन्यातील नाणेफेक संध्याकाळी सात वाजता होईल, जेव्हा दोन्ही संघांचे कर्णधार मैदानावर येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.