Shivam Dube Golden Duck in IPL: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत (IPL) 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे. चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात चेन्नईला खरंतर चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु, नंतर त्यांना मोठे धक्के हरप्रीत ब्रारने दिले.
या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नई संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. चेन्नईकडून अजिंक्य रहाणे आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडने डावाची सुरुवात केली. या दोघांनीही संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यांनी 8 षटकात बिनबाद 64 धावा केल्या होत्या.
मात्र 9 व्या षटकात लेफ्ट-आर्म स्पिनर हरप्रीत ब्रार गोलंदाजीला आला आणि त्याने चेन्नईला दोन मोठे धक्के दिले. त्याने या षटकात टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला बाद केले. रहाणेचा झेल रिली रुसौने डीप मिड-विकेटला पकडला. त्यामुळे रहाणे 29 धावांवर बाद झाला.
त्याच्यापाठोपाठ पुढच्याच चेंडूवर शिवम दुबे पायचीत झाला. दुबेने लगेचच रिव्ह्यूची मागणी केली, मात्र रिव्ह्युमध्येही तो बाद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दुबेला पहिल्याच चेंडूवर (गोल्डन डक) बाद व्हावे लागले.
दरम्यान लेफ्ट आर्म स्पिनरने दुबेला आयपीएलमध्ये बाद करण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी कुमार कार्तिकेय आणि रविंद्र जडेजा या लेफ्ट आर्म स्पिनर्सने त्याला बाद केले आहे.
इतकेच नाही तर दुबे आयपीएलमध्ये शुन्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ असून गोल्डन डकवर म्हणजेच पहिल्या चेंडूवर बाद होण्याची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कोणत्याच गोलंदाजाला त्याला गोल्डन डकवर बाद करता आले नव्हते.
दरम्यान, यंदाच्या हंगामात शिवम दुसऱ्यांदाच एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्स - अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, रिचर्ड ग्लिसन, मुस्तफिजुर रहमान.
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - समीर रिझवी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, प्रशांत सोलंकी
पंजाब किंग्स - जॉनी बेअरस्टो, सॅम करन (कर्णधार), रिली रुसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, ऋषी धवन, विद्वत कवेरप्पा, हरप्रीत सिंग भाटिया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.