IPL 2024 SRH James Franklin : सनरायझर्स हैदराबादने सोमवारी न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स फ्रँकलिनची इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. फ्रँकलिनने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची जागा घेतली. स्टेनने वैयक्तिक कारणांमुळे यंदाच्या आयपीएल हंगामात ब्रेक देण्याची फ्रेंचायझीला विनंती केली होती. नवीन हंगामापूर्वी SRH ने आपला कर्णधारही बदलला आहे.
सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर केले की, 'डेल स्टेन वैयक्तिक कारणांमुळे या हंगामात संघात सामील होणार नाही, त्यामुळे या हंगामात वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी जेम्स फ्रँकलिनकडे देण्यात आली आहे. जेम्स, तुमचे स्वागत आहे.'
फ्रँकलिनने 2001 ते 2013 दरम्यान न्यूझीलंडकडून 31 कसोटी, 110 एकदिवसीय आणि 38 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, 2011 आणि 2012 आयपीएल हंगामात त्याने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले होते.
आयपीएलमधील प्रशिक्षक म्हणून त्याचा हा पहिलाच हंगाम असणार आहे. 43 वर्षीय फ्रँकलिनला इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये डरहॅम संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे आणि तो पाकिस्तान सुपर लीग संघ इस्लामाबाद युनायटेडचा सहाय्यक प्रशिक्षकही आहे. सनरायझर्स हैदराबादमध्ये फ्रँकलिन त्याच्या माजी सहकारी डॅनियल व्हिटोरीसोबत सामील होईल.
व्हिटोरीची 2023 IPL नंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सनरायझर्स हैदराबाद 23 मार्च रोजी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएल 2024 मध्ये त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल.
हैदराबाद 2016 पासून आयपीएल विजेतेपदाची वाट पाहत आहे. त्यावेळी डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली संघ चॅम्पियन झाला. त्यानंतर 2018 मध्ये संघ फायनलमध्ये पोहोचला होता पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. गेल्या मोसमात, संघ 14 सामन्यांत 4 विजयांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.