IPL 2024 Playoff Race : दिल्लीच्या विजयाने प्लेऑफचे बदलले समीकरण! लखनौचा खेळ खल्लास... 3 मध्ये चुरशीची लढत...

IPL 2024 DC vs LSG : दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी लखनौ सुपर जायंटस्‌ संघावर १९ धावांनी मात केली. दिल्लीने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सातव्या विजयासह शेवट गोड केला...
IPL 2024 Playoff Race IPL 2024 DC vs LSG
IPL 2024 Playoff Race IPL 2024 DC vs LSGsakal
Updated on

IPL 2024 Playoff Race IPL 2024 DC vs LSG : दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी लखनौ सुपर जायंटस्‌ संघावर १९ धावांनी मात केली. दिल्लीने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सातव्या विजयासह शेवट गोड केला. पराभवामुळे मात्र लखनौचा पाय खोलात गेला. आता लखनौलाही प्ले ऑफ गाठता येणार नाही. दिल्लीच्या विजयामुळे राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफमधील प्रवेश पक्का झाला आहे.

ट्रिस्टन स्टब्स (नाबाद ५७ धावा), अभिषेक पोरेल (५८ धावा) यांची दमदार फलंदाजी व इशांत शर्माची (३/३४) प्रभावी गोलंदाजी दिल्लीच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली. या लढतीने आयपीएलमधील सर्वाधिक ११२५ षटकार मारण्याचा विक्रम नोंदवला गेला. मागील वर्षी ११२४ षटकार मारण्यात आले होते.

IPL 2024 Playoff Race IPL 2024 DC vs LSG
IPL 2024, DC vs LSG: लखनौला पराभूत केलं दिल्लीनं अन् विजयोत्सव साजरा केला राजस्थाननं

दिल्लीकडून लखनौसमोर २०९ धावांचे आव्हान उभे ठाकले. इशांत शर्माने सुरुवातीलाच लखनौला दणका दिला. त्याने क्विंटॉन डी कॉक (१२ धावा), के. एल. राहुल (५ धावा), दीपक हूडा (०) यांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अक्षर पटेलने मार्कस स्टॉयनिसला पाच धावांवर बाद करीत मोठा धक्का दिला. लखनौचा निम्मा संघ ७१ धावांवर बाद झाला. निकोलस पूरन (६१ धावा) व अर्शद खान (नाबाद ५८ धावा) यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण लखनौला ९ बाद १८९ धावांपर्यंत मजल मारता आली.

IPL 2024 Playoff Race IPL 2024 DC vs LSG
IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

याआधी लखनौ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अर्शद खानने जेक फ्रेसर मॅकगर्कला शून्यावर बाद केले. त्यानंतर मात्र अभिषेक पोरेल व शाई होप या जोडीने ९२ धावांची भागीदारी केली. रवी बिश्‍नोईच्या गोलंदाजीवर होप ३८ धावांवर बाद झाला. पोरेलने ३३ चेंडूंमध्ये पाच चौकार व चार षटकारांसह ५८ धावांची खेळी साकारली. नवीन उल हकने पोरेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवत लखनौसाठी मोलाची कामगिरी बजावली. रिषभ पंतने महत्त्वाच्या ३३ धावा केल्या. नवीनच्याच गोलंदाजीवर तो बाद झाला.

ट्रिस्टन स्टब्स व अक्षर पटेल या जोडीने अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. स्टब्सने २५ चेंडूंमध्ये तीन चौकार व चार षटकारांसह नाबाद ५७ धावांची खेळी केली. अक्षरने नाबाद १४ धावा केल्या. दिल्ली संघाने २० षटकांत चार बाद २०८ धावा केल्या.

चार संघ प्ले ऑफमधून बाहेर

पंजाब, मुंबई व गुजरात या संघाचे प्ले ऑफमधील आव्हान संपुष्टात आले आहे. आता दिल्लीच्या विजयामुळे लखनौ संघाचाही पाय खोलात गेला आहे. लखनौ संघाची एक लढत बाकी आहे. त्यांचा नेट रनरेट वजा आहे. त्यामुळे अखेरच्या लढतीत विजय मिळवल्यानंतरही त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचता येणे अशक्यच आहे. याचा अर्थ एकूण चार संघ बाद झाले आहेत असे म्हणायला याप्रसंगी हरकत नाही. कोलकता व राजस्थान हे संघ प्ले ऑफमध्ये पोहोचले असून हैदराबाद, चेन्नई, बंगळूर व दिल्ली या संघांना अंतिम चारमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.