IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

आयपीएलमध्ये आज दिल्लीचा सामना बलाढ्य राजस्थान रॉयल्स यांच्याबरोबर होणार आहे.
IPL 2024 DC vs RR
IPL 2024 DC vs RRsakal
Updated on

नवी दिल्ली, ता. ६ : प्लेऑफसाठी आव्हान कायम ठेवायचे असेल तर दिल्ली संघाचा कर्णधार रिषभ पंत आणि धडाकेबाज जॅक फ्रेझर मॅकगर्क यांना अफलातून खेळ करावा लागणार आहे. आयपीएलमध्ये आज त्यांचा सामना बलाढ्य राजस्थान रॉयल्स यांच्याबरोबर होणार आहे.

आजच्या सामन्यात दिल्ली संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय हवाच आहे. ११ पैकी पाच सामन्यांत विजय आणि सहा सामन्यात हार अशी त्यांची परिस्थिती आहे. उर्वरित तिन्ही सामने जिंकले तरी त्यांचे जास्तीत जास्त १६ गुण होतील; परंतु एवढे गुणही त्यांना प्लेऑफसाठी पुरेसे ठरणार नाही. इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. जर तरच्या गणिताचा विचार करण्यापेक्षा समोर असलेला सामना जिंकणे हेच ध्येय ठेवून पंतला आपल्या संघाकडून कामगिरी करून घ्यावी लागेल.

IPL 2024 DC vs RR
IPL 2024 Playoffs Scenario : शर्यत झाली रोमांचक! 55 सामने खेळले 9 संघ उरले... पण एकही टीम झाली नाही प्लेऑफसाठी पात्र

कोलकता (११ सामन्यातून १६ गुण), राजस्थान रॉयल्स (१० सामन्यातून १६ गुण) हे संघ प्लेऑफमध्ये असणार हे जवळपास निश्चित आहे, उर्वरित दोन संघांसाठी चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्‌स यांच्यात मुख्यत्वे स्पर्धा आहे. दिल्लीसाठी एकूणच मार्ग कठीण असला तरी संघाची प्रगती करत राहणे हे पंतच्या हाती आहे.

फिरोजशा कोटला मैदानाच्या पाटा खेळपट्टीवर यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि रियान पराग यांचा धडाका रोखण्याचे आव्हान दिल्ली संघाचे प्रमुख गोलंदाज खलील अहमद आणि कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे. त्याताच एका बाजूची सीमारेषा केवळ ६० मीटरवर आहे. त्यामुळे दिल्ली गोलंदाजांना सावध राहावे लागणार आहे.

IPL 2024 DC vs RR
IPL 2024 मधील मोठी बातमी! खराब हवामानामुळे 'या' टीमचे खेळाडू फ्लाइटमध्ये अडकले, अन् रात्री उशिरा....

आत्तापर्यंतच्या सामन्यात मिळून ३८० धावा करणाऱ्या पंतने तीन अर्धशतकेही केलेली आहेत, आणखी एक आक्रमक खेळी करण्यास तो सज्ज असेल; पण त्या अगोदर सलामीला खेळणारा फ्रेझर-मॅकगर्क कशी सुरुवात करतो हे महत्त्वाचे आहे. मुंबईविरुद्ध जबरदस्त टोलेबाजी करणाऱ्या फ्रेझर पुढच्या दोन सामन्यात प्रभाव पाडू शकला नव्हता. पंत असो वा फ्रेझर या दोघांची बॅट तळपली तर सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता या दोघांमध्ये आहे.

पंत आणि फ्रेझरसमोर राजस्थानच्या युझवेंद्र चहल, आर. अश्विन या फिरकी गोलंदाजांसह ट्रेंट बोल्ड आणि संदीप शर्मा या वेगवान गोलंदाजांचे आव्हान असणार आहे.

दिल्लीसाठी राजस्थानच्या फलंदाजीला रोखणेही तेवढेच आव्हानात्मक असणार आहे. खलील अहमद (इकॉनॉमी ९.४७) आणि मुकेश कुमार (११.०५) हे त्यातल्या त्यात सातत्य राखून आहेत; परंतु दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज लिझाड विलियम्स आणि नॉर्किया यांनी निराशा केलेली आहे.

राजस्थान आणि दिल्ली यांच्यातील पहिला साखळी सामना मार्च महिन्यात राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झाला होता. तो सामना जिंकण्याची संधी दिल्लीला होती; परंतु रियान परागने शानदार खेळी करून सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता.

रविवारी झालेल्या सामन्यात कोलकताने लखनौचा मोठ्या फरकाने पराभव करून अव्वल स्थान मिळवले. राजस्थानचा संघ हा पहिला क्रमांक मिळवण्यासाठी आणि कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्न करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.