IPL 2024 : 'सेल्फिश'! विराटनंतर नेटकऱ्यांनी रोहितला केलं ट्रोल

इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी (१४ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चूरशीचा सामना पाहायला मिळाली. या सामन्यात चेन्नईने मुंबईला २० धावांनी पराभूत केले. मुंबईचा पराभव झाला असला तरी मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माने आपले शतक पूर्ण करत नाबाद १०४ धावा केल्या. तरी सुद्धा रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे.
Rohit Sharma and virat kohli
Rohit Sharma and virat kohlisakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी (१४ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चूरशीचा सामना पाहायला मिळाली. या सामन्यात चेन्नईने मुंबईला २० धावांनी पराभूत केले. मुंबईचा पराभव झाला असला तरी मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माने आपले शतक पूर्ण करत नाबाद १०४ धावा केल्या. तरी सुद्धा रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे.

मुंबईला विजय मिळवून देण्यासाठी रोहित शर्मा शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावर खेळत होता, परंतु संघाला यश आले नाही. या सामन्यात रोहितने ६३ चेंडूत १०५ धावा करत आपले आयपीएलमधील दूसरे शतक सुद्धा पूर्ण केले.

त्यानंतर त्याला सोशल मिडीयावर सेल्फिश म्हणून चिडवले जात आहे. यापूर्वी ६ एप्रिलला राजस्थान राॅयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकले होते, तेव्हा सुद्धा सोशल मीडियावर विराटला सेल्फिश म्हणून ट्रोल केलं होतं.

सध्या काही युजर्स रोहितच्या शतकाची तुलना विराटच्या शतकाशी करत त्याला सेल्फिश म्हंटल आहे. या दोघांनी आपल्या संघासाठी शतके ठोकून सुद्धा सामने जिंकले नाहीत. विराटने राजस्थानविरुद्ध खेळताना शतक लगावले परंतु ते व्यर्थ ठरले. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ हारला होता, कारण राजस्थानचा विस्फोटक फलंदाज जोश बटलरने शतक लगावत राजस्थानला विजय मिळवून दिला होता. रोहितने सुद्धा शतक ठोकले परंतु संघाला अपयश आले.

५ वेळा आयपीएल विजेत्या मुंबईची या हंगामातील सुरुवात खराब झाली. संघाला सुरुवातीच्या ३ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. परंतु मुंबईने त्यानंतरचे दोनही सामने जिंकले. पण चेन्नईविरुद्धची सहावी मॅच मुंबईने हारली आहे. आत्तापर्यंत मुंबईने ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी ४ सामन्यांत संघाला पराभव आला आहे.

पाॅईंट टेबलमध्ये मुंबई २ विजयांसह आठव्या क्रमांकावर आहे. आता पुढचा सामना १८ एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्ध खेळणार आहे. तर चेन्नई आपला पुढचा सामना १९ एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळणार आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, चेन्नईविरुद्ध मुंबईने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकात २०६ धावा केल्या. ऋतुराज गायकवाड (६९) आणि शिवम दूबे (६६) यांनी अर्धशतके पूर्ण केली. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकडून संघाला २० षटकात केवळ १८६ धावा करता आल्या आणि मुंबई संघ २० धावांनी हरला.

Rohit Sharma and virat kohli
MI vs CSK IPL 2024 : 'स्टंपच्या मागे त्या व्यक्तीने...' मुंबईच्या पराभवानंतर धोनीबद्दल काय म्हणाला हार्दिक पांड्या?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.