KKR vs SRH Final: IPL ट्रॉफीसाठी भिडणार कोलकाता-हैदराबाद! जाणून घ्या कोण कोणाला ठरलंय वरचढ अन् फायनलचा रेकॉर्ड

IPL 2024 Final, KKR vs SRH: आयपीएल 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने असणार आहेत. त्यांचा आत्तापर्यंतचा हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा राहिला आहे, जाणून घ्या.
Shreyas Iyer Pat Cummins KKR vs SRH
Shreyas Iyer Pat Cummins KKR vs SRHSakal
Updated on

IPL 2024 Final, KKR vs SRH Head to Head: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (26 मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) खेळवला जाणार आहे.

आयपीएल 2024 मध्ये 73 सामन्यांनंतर कोलकाता आणि हैदराबाद हे दोन संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्यात यशस्वी ठरले. आता या दोन्ही संघांपैकी विजेतेपदाची ट्रॉफी कोण उंचावणार याची उत्सुकता आहे.

दरम्यान, यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार नाही, हे निश्चित आहे. कारण कोलकाता आणि हैदराबाद हे दोन्ही संघ आयपीएलचे माजी विजेते आहेत.

आता हे दोन संघ अंतिम सामन्यात भिडणार असल्याने त्यांच्यातील आमने-सामने आकडेवारी जाणून घेऊ.

Shreyas Iyer Pat Cummins KKR vs SRH
IPL 2024: काय सांगता! आयपीएल फायनलमध्ये खेळणार नाहीत टी20 वर्ल्ड कपमधील एकही भारतीय खेळाडू? जाणून घ्या कारण

आमने-सामने

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स आत्तापर्यंत 27 वेळा आमने-सामने आले आहेत. या 27 सामन्यांमधील 9 सामन्यात हैदराबादने विजय मिळवला आहे, तर 18 सामने कोलकाताने जिंकले आहेत.

तसेच गेल्या सहा सामन्यांपैकी 4 सामने कोलकाताने आणि 2 सामने हैदराबादने जिंकले आहेत.

आयपीएल 2024 मध्ये या दोन संघात दोन सामने झाले. पहिला सामना साखळी फेरीत झाला होता, ज्यामध्ये कोलकाताने 4 धावांनी रोमांचक विजय मिळवलेला. त्याचबरोबर दुसरा सामना क्वालिफायर-1 मध्ये झालेला. या सामन्यातही कोलकातानेच 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता.

अंतिम सामन्यातील कामगिरी

कोलकाताने क्वालिफायरमध्ये हैदराबादला पराभूत करत थेट अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळे त्यांनी आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याची ही चौथी वेळ असणार आहे.

यापूर्वी कोलकाताने 2012, 2014 आणि 2021 साली आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. यातील 2012 आणि 2014 साली आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे, तर 2021 मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

विशेष म्हणजे 2012 साली कोलकाताने चेन्नईमध्येच विजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा 12 वर्षांनी कोलकाता चेन्नईमध्ये अंतिम सामना खेळणार आहेत.

Shreyas Iyer Pat Cummins KKR vs SRH
IPL 2024, Qualifier 2: हैदराबादने राजस्थानला स्पर्धेतून बाहेर करताच स्टेडियममध्ये फॅनला कोसळलं रडू, Photo Viral

हैदराबादबद्दल सांगायचे झाले, तर आयपीएल 2024 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सला पराभूत करत त्यांनी अंतिम सामना गाठला आहे.

हैदराबादने आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याची ही तिसरी वेळ असणार आहे. यापूर्वी 2016 आणि 2018 साली त्यांनी अंतिम सामना खेळला आहे. यातील 2016 साली त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली होती, तर 2018 साली उपविजेतेपदवर समाधान मानावे लागले होते.

सर्वाधिक धावा अन् सर्वाधिक विकेट्स

आयपीएल 2024 मध्ये कोलकाताकडून सर्वाधिक धावा सुनील नारायणने केल्या आहेत. त्याने 13 सामन्यांत 482 धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक 20 विकेट्स वरूण चक्रवर्तीने घेतल्या आहेत. हैदराबादकडून सर्वाधिक धावा ट्रेविस हेडने केल्या आहेत. त्याने 14 सामन्यांत 567 धावा केल्या आहेत, तर सर्वाधिक 19 विकेट्स टी नटराजनने घेतल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.