IPL 2024 GT vs PBKS : पंजाबचा गुजरातवर विजय ; शशांक सिंगच्या नाबाद अर्धशतकामुळे बाजी

शशांक सिंगने झळकावलेल्या नाबाद ६१ धावांच्या खेळीसह इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आशुतोष शर्माने केलेल्या ३१ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने गुरुवारी झालेल्या आयपीएल लढतीत गुजरात टायटन्सवर तीन विकेट व एक चेंडू राखून रोमहर्षक विजय मिळवला. पंजाबचा हा दुसरा विजय ठरला.
IPL 2024 GT vs PBKS
IPL 2024 GT vs PBKSsakal
Updated on

अहमदाबाद,: शशांक सिंगने झळकावलेल्या नाबाद ६१ धावांच्या खेळीसह इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आशुतोष शर्माने केलेल्या ३१ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने गुरुवारी झालेल्या आयपीएल लढतीत गुजरात टायटन्सवर तीन विकेट व एक चेंडू राखून रोमहर्षक विजय मिळवला. पंजाबचा हा दुसरा विजय ठरला. गुजरातला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरातने क्षेत्ररक्षणात केलेल्या सुमार कामगिरीमुळे त्यांचा पराभव झाला. त्यांनी चार झेल सोडले.

गुजरातने पंजाबसमोर २०० धावांचे आव्हान ठेवले. उमेश यादवने कर्णधार शिखर धवनचा एक धावेवरच त्रिफळा उडवला. जॉनी बेअरस्टो व प्रभसिमरन सिंग ही जोडी पंजाबसाठी छान कामगिरी करणार असे वाटत असतानाच नूर अहमदच्या गोलंदाजीवर बेअरस्टो २२ धावांवर बाद झाला. नूर अहमद याने प्रभसिमरनलाही (३५ धावा) बाद करीत पंजाबला बॅकफूटवर फेकले. या लढतीत सॅम करनही अपयशी ठरला. पंजाबने ७० धावा देत चार फलंदाज गमावले. मोहित शर्माने सिकंदर रझा याला १५ धावांवर बाद केले.

IPL 2024 GT vs PBKS
IPL 2024 GT vs PBKS : शशांक सिंगचे झुंजार अर्धशतक, पंजाबने गुजरातचा विजयी घास हिरावला

पंजाबचा संघ संकटात असताना शशांक सिंग याने जितेश शर्मा (१६ धावा), आशुतोष शर्मा (३१ धावा, इम्पॅक्ट खेळाडू) यांच्या साथीने पंजाबच्या विजयाची आशा कायम ठेवली. शशांकने नाबाद ६१ धावांची खेळी साकारताना सहा चौकार व चार षटकार मारले. शशांकच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पंजाबने विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

गुजरातच्या रिद्धिमान साहाचा सुमार फॉर्म याही लढतीत कायम राहिला. कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर तो ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल व अनुभवी केन विल्यमसन या जोडीने ४० धावांची भागीदारी केली. दोघांनी या भागीदारीत आक्रमक फलंदाजी केली नाही; पण विकेट गमावली नाही. हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर विल्यमसन २६ धावांवर जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद झाला आणि जोडी तुटली.

शुभमन गिलसोबत साई सुदर्शनने गुजरातच्या धावसंख्येत भर टाकण्याचे काम केले. सुदर्शनने १९ चेंडूंमध्ये ३३ धावांची खेळीही साकारली. हर्षल पटेलने सुदर्शनला पॅव्हेलियनमध्ये पाठवत ५३ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. रबाडाने विजय शंकरला आठ धावांवर बाद केले. गिलने मात्र एका बाजूने शानदार फलंदाजी केली. त्याने ४८ चेंडूंमध्ये सहा चौकार व चार षटकारांची आतषबाजी करताना नाबाद ८९ धावांची नेत्रदीपक खेळी केली. राहुल तेवतिया याने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करीत नाबाद २३ धावा केल्या. गुजरातने २० षटकांमध्ये चार बाद १९९ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक : गुजरात टायटन्स २० षटकांत ४ बाद १९९ धावा (शुभमन गिल नाबाद ८९, केन विल्यमसन २६, साई सुदर्शन ३३, राहुल तेवतिया नाबाद २३, कागिसो रबाडा २/४४) पराभूत वि. पंजाब किंग्स १९.५ षटकांत ७ बाद २०० धावा (प्रभसिमरन सिंग ३५, शशांक सिंग नाबाद ६१, आशुतोष शर्मा ३१, नूर अहमद २/३२).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.