IPL 2024, GT vs RCB: विल जॅक्सचं झंझावाती शतक अन् विराटची तोलामोलाची साथ; बेंगळुरूने गुजरातला 9 विकेट्सने दिली मात

IPL 2024, GT vs RCB Scorecard Update: आयपीएलमधील 45 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात टायटन्सविरुद्ध 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला
GT vs RCB| IPL 2024
GT vs RCB| IPL 2024Sakal
Updated on

Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रविवारी 45 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघ आमने-सामने होते. अहमदाबादला झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने 9 विकेट्सने विजय मिळवला.

बेंगळुरूचा हा आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 10 सामन्यांतील तिसरा विजय ठरला. तसेच गुजरातला मात्र 10 सामन्यांमधील सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 200 धावा केल्या होत्या आणि बेंगळुरूसमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान बेंगळुरूने 16 षटकात एकच विकेट गमावत 206 धावा करून पूर्ण केले.

बेंगळुरूच्या विजयात विल जॅक्सने शतक करत मोलाचा वाटा उचलला. त्याला विराट कोहलीनेही अर्धशतक करत चांगली साथ दिली.

IPL 2024, GT vs RCB Live Score: विल जॅक्सचं झंझावाती शतक अन् विराटची तोलामोलाची साथ; बेंगळुरूने गुजरातला 9 विकेट्सने दिली मात

अर्धशतकानंतर विल जॅक्सने तुफानी खेळ केला. त्याने अर्धशतक 31 चेंडूत पूर्ण केल्यानंतर पुढच्या 10 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकार ठोकत शतक पूर्ण केले. त्याने 16 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत बेंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना शतकालाही गवसणी घातली. त्याला विराटनेही तोलामोलाची साथ दिली.

बेंगळुरूच्या विजयानंतर जॅक्स 41 चेंडूत 5 चौकार आणि 10 षटकारांसह 100 धावा करून नाबाद राहिला, तर विराट कोहली 44 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 70 धावा करून नाबाद राहिला.

IPL 2024, GT vs RCB Live Score: विराटपाठोपाठ विल जॅक्सचंही अर्धशतक! बेंगळुरू 150 धावा पार

विराटला विल जॅक्सने शानदार साथ देताना वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले. त्याने 31 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे आयपीएलमधील दुसरे अर्धशतक आहे. यासह बेंगळुरूने दीडशे धावांचा टप्पाही 15 व्या षटकात पूर्ण केला.

IPL 2024, GT vs RCB Live Score: विराट कोहलीचा धडाका कायम! 159 च्या स्ट्राईक रेटने ठोकलं शानदार अर्धशतक

फाफ डू प्लेसिस बाद झाल्यानंतर बेंगळुरूचा डाव विराट कोहलीने विल जॅक्ससह सांभाळला. यादरम्यान, त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये 400 धावांचाही टप्पा पार केला. तसेच १० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत त्याने 32 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.

हे अर्धशतक त्याने जवळपास 159 च्या स्ट्राईक रेटने केले. हे विराटचे आयपीएलच्या या 17 व्या हंगामातील चौथे अर्धशतक आहे. त्याच्या अर्धशतकासह बेंगळुरूने 10 षटकात 1 बाद 98 धावा केल्या.

IPL 2024, GT vs RCB Live Score: साई किशोरचा बेंगळुरूला पहिला धक्का! कर्णधार फाफ डू प्लेसिस षटकार मारण्याच्या प्रयत्नात आऊट

गुजरातने दिलेल्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी बेंगळुरूकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीला उतरले होते. एक बाजू विराटने सांभाळलेली असताना फाफ डू प्लेसिसने आक्रमक सुरुवात केली होती.

मात्र, त्याला चौथ्या षटकात साई किशोरने बाद केले. डू प्लेसिस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विजय शंकरकडे झेल देत बाद झाला. डू प्लेसिसने 12 चेंडूत 24 धावांची खेळी केली.

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातचे बेंगळुरूसमोर 201 धावांचं लक्ष्य! सुदर्शन-शाहरुखची खणखणीत अर्धशतके

सुदर्शनने अर्धशतकानंतरही शानदार खेळ केला, त्याला डेव्हिड मिलरचीही चांगली साथ मिळाली. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी नाबाद 69 धावांची भागीदारी झाली.

त्यामुळे गुजरातने 20 षटकात 3 बाद 200 धावांपर्यंत मजल मारली आणि बेंगळुरूसमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यावेळी सुदर्शन 49 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकार मारत 84 धावांवर नाबाद राहिला, तसेच मिलर 19 चेंडूत 26 धावांवर नाबाद राहिला.

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुखनंतर सुदर्शनचेही शानदार अर्धशतक; गुजरातची दीडशे धावांकडे वाटचाल

गुजरातकडून शाहरुखनंतर साई सुदर्शननेही अर्धशतक ठोकले आहे. त्याने 34 चेंडूच अर्धशतक केले. गुजरातने 15 षटकात 3 बाद 138 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता त्यांची वाटचाल दीडशे धावांकडे सुरू आहे.

IPL 2024, GT vs RCB Live Score: सिराजने अर्धशतक करणाऱ्या शाहरुखचा उडवला त्रिफळा! गुजरातचे 3 फलंदाज परतले माघारी

शाहरुख खानने आक्रमक खेळत अर्धशतक पूर्ण केले होत. परंतु, अर्धशतकानंतर १५ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने त्याला त्रिफळाचीत केले. त्यामुळे त्याला माघारी परतावे लागले. शाहरुखने 30 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांसह 58 धावांची खेळी केली. शाहरुख बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर फलंदाजीला आला आहे.

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुख खानचे दमदार अर्धशतक, गुजरातने पार केला 120 धावांचा टप्पा

सलामीवीरांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्यानंतर गुजरातचा डाव शाहरुख खान आणि साई सुदर्शन यांनी सांभाळला. यावेळी दोघांनीही आक्रमक खेळ केला. दरम्यान, 13 व्या षटकात कॅमेरॉन ग्रीनविरुद्ध षटकार ठोकत शाहरुखने 24 चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. यासह गुजरातने 120 धावांचा टप्पाही पार केला.

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर गुजरातचा डाव शुभमन गिल आणि साई सुदर्शनने सावरला होता. मात्र पॉवर-प्लेच्या 6 षटकानंतर सातव्या षटकात डू प्लेसिसने मॅक्सवेलच्या हातात चेंडू सोपवला.

त्यानेही पहिल्या तीन चेंडूत तीनच धावा दिल्यानंतर चौथ्या चेंडूवर गिलचा अडथळा दूर केला. गिलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा झेल कॅमेरॉन ग्रीनने घेतला. त्यामुळे 19 चेंडूत 16 धावा करून गिलला माघारी परतावे लागले.

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि कर्णधार शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, त्यांना पहिला धक्का पहिल्याच षटकात बसला. स्वप्निल सिंगने वृद्धिमान साहाला 5 धावांवर बाद केलं.

जाणून घ्या गुजरात-बेंगळुरूची प्लेइंग-11

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल.

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - अनुज रावत, महिपाल लोमरोर, हिमांशू शर्मा, आकाश दीप, विजयकुमार वैशाख

गुजरात टायटन्स - वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, आर साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - संदीप वॉरियर, शरद बीआर, मानव सुथार, दर्शन नळकांडे, विजय शंकर

IPL 2024, GT vs RCB Live Score: फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस, मॅक्सवेलचं झालं पुनरागमन

आयपीएल 2024 स्पर्धेत रविवारी होत असलेल्या 45 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमने-सामने आहेत. या सामन्यात बेंगळुरूच्या कर्णधार फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून बेंगळुरू संघात ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले आहे. त्याने गेल्या काही सामन्यांत विश्रांती घेतली होती. तसेच गुजरातने मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही.

Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru: इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये (IPL) रविवारी (28 एप्रिल) डबल हेडर म्हणजेच दोन सामने खेळवण्यात येणार आहे.

यातील पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात दुपारी 3.30 वाजता चालू होणार आहे. हा सामना गुजरातच्या घरच्या मैदानावर म्हणजेच नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर अहमदाबाद येथे होणार आहे.

बेंगळुरू आणि गुजरात हे दोन संघ आत्तापर्यंत तीन वेळा आमने-सामने आले असून दोनदा गुजरातने विजय मिळवला आहे, तर एक सामना बेंगळुरूने जिंकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.