IPL 2024 Host Team Winning Matches : चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या बालेकिल्लात त्यांचा उत्कृष्ट विक्रम कायम राखत आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईने मंगळवारी आयपीएल 2024 च्या सातव्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 63 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
आयपीएल 2024 चे आतापर्यंत एकूण सात सामने खेळले गेले आहेत, आणि सातही सामन्यांमध्ये एक गोष्ट सेम घडली. ती म्हणजे ज्या संघाच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळला गेला तो यजमान संघाने जिंकला आहे. त्याची सुरुवात हंगामातील पहिल्या सामन्याने झाली. तेव्हापासून आतापर्यंत सात सामने खेळले गेले आहेत आणि सर्व सामन्यांमध्ये फक्त तेच संघ जिंकले आहेत, ज्यांच्या घरच्या मैदानावर सामने खेळले गेले आहेत.
आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नईत खेळला गेला. जेथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात चंदिगढमधील मुल्लनपूरमधील महाराज यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पंजाब किंग्सने 4 विकेट्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. शनिवारीच आयपीएल तिसरा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानात म्हणजेच इडन गार्डन्सवर खेळला गेला, जिथे त्याने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला.
राजस्थान रॉयल्सचा बालेकिल्ला जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर त्याने लखनौ सुपर जायंट्स संघाचा 20 धावांनी पराभव केला. तर त्याच दिवशी पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला गेला. गुजरातने हा सामना जिंकला. आणि सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने त्यांच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्जचा पराभव केला. आणि आता 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या बालेकिल्ला गुजरात टायटन्सचा पराभव केला.
आज मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. आणि हा सामना हैदराबादमध्ये होणार आहे. त्यामुळे आज यजमान सनरायझर्स हैदराबाद जिंकणार की मुंबई इंडियन्स हा ट्रेंड मोडणार.... यावर सर्वांचे लक्ष्य असणार आहे. त्यामुळे हा सामना खूपच रंजक असेल, कारण दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.