IPL 2024, KKR vs DC : कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

IPL 2024, KKR vs DC Scorecard Update: आयपीएलच्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सोपा विजय मिळवला
Phil Salt | KKR vs DC | IPL 2024
Phil Salt | KKR vs DC | IPL 2024Sakal
Updated on

Kolkata Knight Riders vs Delhi Capitals

आयपीएल 2024 स्पर्धेत 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात ईडन गार्डन्स संघात खेळवला गेला. या सामन्यात कोलकाताने 7 विकेट्सने सोपा विजय मिळवला. हा कोलाकाताचा 9 सामन्यांतील 6 वा विजय होता.

दरम्यान, गेल्यासामन्यात 261 धावा करूनही पराभव स्विकाराला लागल्यानंतर या सामन्यातून कोलकाताने चांगले पुनरागमन केले आणि विजय मिळवला.

तथापि, दिल्लीसाठी मात्र अडचणी वाढल्या आहेत. त्यांना 11 सामन्यांतील 6व्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 153 धावा केल्या आणि कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. यानंतर 154 धावांचे लक्ष्य कोलकाताने 3 विकेट्स गमावत 157 धावा करत 16.3 षटकात पूर्ण केले.

कोलकाताच्या विजयात फिलिप सॉल्टने आक्रमक अर्धशतक करत, तर वरुण चक्रवर्तीने 3 महत्त्वाच्या विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

तीन विकेट्सनंतर कोलकाताचा डाव कर्णधार श्रेयस अय्यरने वेंकटेश अय्यरच्या साथीने सांभाळला. या दोघांनीही नंतर दिल्लीला विकेट मिळू न देताना कोलकाताला विजयापर्यंत पोहचवले. 17 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वेंकटेशने विजयी षटकार खेचला.

यासह कोलकाताने 7 विकेट्सने विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेरीस श्रेयस अय्यर 23 चेंडूत 33 धावांवर नाबाद राहिला, तर वेंकटेश अय्यर 23 चेंडूत 26 धावांवर नाबाद राहिला.

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

सलामीवीर बाद झाल्यानंतर कोलकाताला तिसरा धक्काही लवकर बसला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला रिंकू सिंग 10 व्या षटकात 11 धावांवर बाद झाला. लिझाद विल्यमच्या गोलंदाजीवर त्याचा झेल कुलदीप यादवने घेतला.

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

नारायणला बाद केल्यानंतर अक्षर पटेलने नवव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सॉल्टला त्रिफळाचीत केले. त्यामुळे सॉल्ट 33 चेंडूत 68 धावांवर माघारी परतला. त्याने या खेळीत 7 चौकार आणि 5 षटकार मारले.

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

कोलकाताकडून सॉल्टने अर्धशतक ठोकत चांगली सुरुवात केली होती. पण अखेर दिल्लीला पहिलं यश अक्षर पटेलने मिळवून दिलं. त्याने सातव्या षटकात सुनील नारायणला 15 धावांवर बाद केलं. नारायणचा झेल जॅक फ्रेझर-मॅकगर्कने घेतला.

IPL 2024, KKR vs DC Live Score: फिलिप सॉल्टची तुफानी फटकेबाजी, दिल्लीविरुद्ध ठोकलं आक्रमक अर्धशतक

कोलकाताकडून सॉल्टने आक्रमक खेळताना 6 व्या षटकातच 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने अर्धशतक करताना 5 चौकार आणि 4 षटकार मारले. त्यामुळे पॉवर-प्लेच्या 6 षटकातच दिल्लीने 70 धावांचा टप्पा ओलांडला.

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताच्या सलामीवीरांची दणक्यात सुरुवात, 5 ओव्हरमध्येच पूर्ण केल्या 60 धावा

दिल्लीने दिलेल्या 154 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कोलकाताकडून फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायण सलामीला फलंदाजीसाठी उतरले. नारायणने एक बाजू सांभाळलेली असताना सॉल्टने आक्रमक खेळ केला. त्यामुळे त्यांनी पहिल्या 5 षटकातच बिनबाद 61 धावा केल्या आहेत.

चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

अखेरच्या षटकात कुलदीप यादवने दोन चौकार मारले. त्यामुळे दिल्लीला 150 धावांचा टप्पा गाठणं सोपं गेलं. त्यामुळे दिल्लीने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या तरी 20 षटकात 9 बाद 153 धावा केल्या आणि कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

कुलदीप 26 चेंडूत 35 धावांवर नाबाद राहिला. त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला. तसेच लिझाद विल्यम्स 1 धाव केली.

कोलकाताकडून 4 षटकात 16 धावा देत वरुण चक्रवर्तीने या सामन्यात 3 विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

आठवी विकेट 15 व्या षटकात गमावल्यानंतर दिल्लीचा डाव कुलदीप यादव आणि रसिख दार सलामने सावरला होता. त्यांनी 18 व्या षटकापर्यंत दिल्लीला 139 धावांपर्यंत पोहचवले होते. परंतु, रसिखला 19 व्या षटकात हर्षित राणाने बाद केलं. त्याचा झेल श्रेयस अय्यरने घेतला. रसिखने 8 धावा केल्या. आता दिल्लीसमोर किमान 150 धावांचा टप्पा गाठण्याचे आव्हान असेल.

IPL 2024, KKR vs DC Live Score:  कुमार कुशाग्रलाही चक्रवर्तीने केलं बाद

दिल्लीचा आठवा धक्का चक्रवर्तीने दिला. त्याने 15 व्या षटकात कुमार कुशाग्रला १ धावेवर बाद केलं.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

दिल्लीच्या संघाला सातत्याने मोठे धक्के बसले आहेत. त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. पंत बाद झाल्यानंतरही 13 व्या षटकात ट्रिस्टन स्टब्सला चक्रवर्तीनेच बाद केले. 4 धावांवर त्याचा झेल फिल सॉल्टने झेल घेतला. त्यानंतर 14 व्या षटकात सुनील नारायणने अक्षर पटेलला 15 धावांवर त्रिफळाचीत केले.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये, कर्णधार ऋषभ पंतनेही स्वस्तात गमावली विकेट

वरच्या फळीतील विकेट्स झटपट गेल्यानंतर दिल्लीचा डाव सांभाळण्याची जबाबदारी ऋषभ पंत आणि अक्षर पटेलच्या खांद्यावर होती. परंतु, पंत फारकाळ मैदानावर टिकणार नाही, याची जबाबदारी वरुण चक्रवर्तीने घेतली.

त्याने 10 व्या षटकात टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर पंत श्रेयस अय्यरकडे झेल देत बाद झाला. त्याने 20 चेंडूत 27 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर अक्षरला साथ देण्यासाठी ट्रिस्टन स्टब्स आला आहे.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली चौथी विकेट; आता जबाबदारी कर्णधार पंत अन् अक्षरवर

पॉवरप्लेमध्येच 3 विकेट्स गमावल्यानंतर अभिषेक पोरेलसह कर्णधार ऋषभ पंत सांभाळत होता. परंतु, पॉवर-प्ले संपल्यानंतर लगेचच 7 व्या षटकात पोरेलही बाद झाला. त्याला हर्षित राणाने 18 धावांवर त्रिफळाचीत केले. त्यामुळे तो बाद झाल्यानंतर पंतला साथ देण्यासाठी अश्रर पटेल आला आहे. 7 षटकात दिल्लीने 4 बाद 68 धावा केल्या होत्या.

IPL 2024, KKR vs DC Live Score: पॉवर-प्ले कोलकाताच्या गोलंदाजांनी गाजवला, सलामीवीरांनंतर शाय होपदेखील परतला पॅव्हेलियनमध्ये

सलामीवीर लवकर माघारी परतल्यानंतर पोरेलसह शाय होपने दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, वैभव अरोराने चौथ्या षटकात होपला 6 धावांवर त्रिफळाचीत केले.

IPL 2024, KKR vs DC Live Score: स्टार्कने दिल्लीला दिला दुसरा मोठा धक्का! धोकादायक फ्रेझर-मॅकगर्कला धाडलं माघारी

पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर फ्रेझर-मॅकगर्कने धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तिसऱ्या षटकात अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने त्याचा अडथळा दूर केला. स्टार्कच्या गोलंदाजीवर त्याचा झेल वेंकटेश अय्यरने टिपला. त्यामुळे फ्रेझर-मॅकगर्कला 7 चेंडूत 12 धावा करून माघारी परतावे लागले.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीला बसला पहिला धक्का! पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ स्वस्तात बाद

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीकडून सलामीला पृथ्वी शॉ आणि जॅक फ्रेझर मॅकगर्क उतरले होते. मात्र, यावेळी फ्रेझर-मॅकगर्कने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरूवात करता आली नाही. त्यातच आक्रमक खेळणारा पृथ्वी शॉ दुसऱ्या षटकात वैभव अरोराविरुद्ध खेळताना यष्टीरक्षक फिलिप सॉल्ककडे झेल देत बाद झाला.

आधी पंचांनी त्याला नाबाद दिले होते, परंतु, कोलकाताने घेतलेल्या रिव्ह्युमध्ये तो बाद असल्याचे स्पष्ट झाले. शॉने 7 चेंडूत 13 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर अभिषेक पोरेल फलंदाजीला आला आहे.

जाणून कोलकाता-दिल्ली संघांची प्लेइंग-11

कोलकाता नाइट रायडर्स: फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - अंगक्रिश रघुवंशी, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाय होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रिकी भुई, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन

आयपीएल 2024 स्पर्धेत 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात ईडन गार्डन्स संघात खेळवला जात आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून दिल्लीकडून पृथ्वी शॉचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे, तर कोलकाता संघातही मिचेल स्टार्क आणि वैभव अरोरा या खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.

Kolkata Knight Riders vs Delhi Capitals: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 47 वा सामना सोमवारी (29 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सनवर होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. तसेच 7 वाजता टॉस होणार आहे.

कोलकाता आणि दिल्ली संघात आत्तापर्यंत 33 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील १५ सामने दिल्लीने जिंकले आहेत, तर 17 सामने कोलकाताने जिंकले आहेत. त्याचबरोबर एका सामन्याला निकाल लागलेला नाही.

याबरोबर याआधी आयपीएलच्या चालू असलेल्या 17 व्या हंगामात या दोन संघात 3 एप्रिलला एक सामना झाला आहे, ज्यात कोलकाताने 106 धावांनी विजय मिळवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.