IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ३१ वा सामना मंगळवारी (१६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान राॅयल्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने कोलकाताला २ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यानंतर केकेआरचा अष्टपैलू सुनील नरायण आणि राजस्थानचा यष्टीरक्षक फलंदाज जाॅस बटलर यांनी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये प्रवेश केला आहे.
केकेआर विरुद्ध राजस्थान सामन्यात जाॅस बटलरने ६० चेंडूत १०७ धावा केल्या, ज्यामध्ये ९ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. सुनील नरायणने ५६ चेंडूत १०९ धावा केल्या, ज्यामध्ये १३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.
ऑरेंज कॅपच्या यादीत विराट कोहली प्रथम
आयपीएल २०२४ मध्ये आत्तापर्यंत सर्वात जास्त धावा करण्याच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने आत्तापर्यंत ७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७२.२ च्या सरासरीने ३६१ धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राजस्थानचा रियान पराग आहे. रियानने आत्तापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांत ६३.६ च्या सरासरीने ३१८ धावा केल्या आहेत.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक लगावल्यानंतर सुनील नरायणनेही या शर्यतीत उडी घेतली आहे. सुनीलने खेळलेल्या ६ सामन्यांत ४६ च्या सरासरीने २७६ धावा केल्या आहेत. तसेच राजस्थानचा संजू सॅमसन आपल्या २७६ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा यादीत ५ व्या स्थानावर आहे. रोहितने ६ सामन्यांत २६१ धावा केल्या आहेत.
सहाव्या क्रमांकावर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल आहे. गिलने ६ सामन्यांत २५५ धावा केल्या आहेत. तर ६ सामन्यांत २५३ धावा करत सनरायझर्स हैदराबादचा हेन्रिक क्लासेन सातव्या स्थानावर आहे. केकेआरविरुद्धच्या शतक ठोकल्यानंतर जाॅस बटलर हा या यादीत आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने ६ सामन्यांत २५० धावा केल्या आहे.
पाँइंट्स टेबलमध्ये राजस्थानचे वर्चस्व
पाॅईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राजस्थान आहे. राजस्थानने आत्तापर्यंत ७ सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाला फक्त एका सामनात अपयश आले आहे. संघाने ६ सामने जिंकले आहेत. तर केकेआर आपल्या ४ विजयांसह पाॅईंट्स टेबलमध्ये दूसऱ्या क्रमांकावर आहे. केकेआरने ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाला दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.