IPL 2024 Point Table : लखनऊविरुद्ध पराभवानंतर RCB ला मोठा धक्का! टेबलमध्ये पांड्याची मुंबई आहे तरी कुठे?

IPL 2024 Latest Points Table : आयपीएल 2024 चा पंधरावा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला.
IPL 2024 Point Table
IPL 2024 Point Table RCB vs LSG News Marathi sakal
Updated on

IPL 2024 Latest Points Table : आयपीएल 2024 चा पंधरावा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने 28 धावांनी विजय मिळवला. या विजयासह लखनऊ सुपर जायंट्सला पॉइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. त्याचवेळी मोसमातील तिसऱ्या पराभवानंतर आरसीबीची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे.

IPL 2024 Point Table
RCB vs LSG: तीन कॅच अन् रॉकेट थ्रो! फक्त तुफानी फलंदाजीच नाही, तर पूरनने फिल्डिंगमध्येही खाल्ला भाव; पाहा Video

लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत या मोसमातील दुसरा विजय मिळवला. त्याचबरोबर त्यांना आतापर्यंत केवळ 1 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन विजयांसह लखनऊ सुपर जायंट्सचे 4 गुण झाले असून ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत.

लखनऊ सुपर जायंट्सला 2 स्थानांचा फायदा झाला आहे. यापूर्वी ते सहाव्या क्रमांकावर होते. दुसरीकडे, एलएसजीच्या विजयानंतर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादचे प्रत्येकी 1 स्थान खाली गेले आहेत.

IPL 2024 Point Table
Mayank Yadav Video: मयंकच्या वेगानं RCB चे फलंदाज गारद! 156.7kph स्पीडचा बॉल टाकत रचला नवा विक्रम

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचीही यंदाच्या हंगामात खराब सुरुवात झाली आहे. या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यापैकी RCB संघाला 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. यातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने घरच्या मैदानावर 2 सामने गमावले आहेत. या तीन पराभवांसह, तो गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहे आणि त्याचा निव्वळ धावगती -0.876 झाला आहे. तर मुंबईने तिन्ही सामने गमावल्यामुळे गुणांचे खाते उघडलेले नाही. आणि तो शेवटच्या स्थानावर आहे.

IPL 2024 Point Table
IPL 2024: डी-कॉक-पूरनचं आक्रमण अन् मयंक यादवचा वेग, लखनऊने RCB ला घरच्याच मैदानात केलं चीतपट

राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. राजस्थान रॉयल्सने या मोसमात आतापर्यंत 3 सामने खेळले असून सर्व सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स संघ 2 सामन्यात 2 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्ज संघ तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.