IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवानंतर शुभमन गिलने कोणाला धरले जबाबदार?

IPL 2024 LSG vs GT Shubman Gill : आयपीएल 2024 मध्ये कर्णधार म्हणून युवा शुभमन गिलने विजयाने सुरुवात केली.
Shubman Gill
IPL 2024 LSG vs GT Shubman Gillsakal
Updated on

IPL 2024 LSG vs GT Shubman Gill : आयपीएल 2024 मध्ये कर्णधार म्हणून युवा शुभमन गिलने विजयाने सुरुवात केली. परंतु आता सलग दोन सामन्यांमध्ये त्याला सलग पराभवाचा सामना करावा लागला. कालच्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या 33 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्या पराभवासाठी कर्णधार शुभमन गिलने आपल्या फलंदाजांना जबाबदार धरले.

Shubman Gill
LSG vs GT : चालू सामन्यात DRS वरून राडा, कर्णधार गिल अन् गुजरातचे खेळाडू अंपायरशी भिडले

अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसच्या (58 धावा) अर्धशतकानंतर यश ठाकूरच्या (30 धावांत पाच विकेट्स) चमकदार कामगिरीमुळे एलएसजीने गुजरात टायटन्सचा 33 धावांनी पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला.

एलएसजीचा गुजरात टायटन्सवरील हा पहिला विजय आहे. सामन्यानंतर गिल म्हणाला, “मला वाटतं फलंदाजीसाठी ही विकेट चांगली होती. पण आमची फलंदाजी खराब होती. आम्ही चांगली सुरुवात केली पण मधल्या षटकांमध्ये विकेट्स गमावल्या ज्यातून आम्हाला सावरता आले नाही.

आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक करताना तो म्हणाला, “या सामन्यात आम्हाला 170-180 धावांची अपेक्षा होती. पण आमच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. हे लक्ष्य गाठता आले असते.

Shubman Gill
IPL 2024 : लखनौला मोठा धक्का! 'स्पीड गन' Mayank Yadav जखमी, एका ओव्हरनंतर अचानक...

स्टॉइनिसच्या अर्धशतकानंतर एलएसजीने निकोलस पूरनच्या नाबाद 32 धावांच्या खेळीच्या जोरावर पाच गड्यांच्या मोबदल्यात 163 धावा केल्या. शुभमन गिल (19 धावा) आणि साई सुदर्शन (31 धावा) यांच्यातील पहिल्या विकेटसाठी 54 धावा जोडून गुजरात टायटन्सने चांगली सुरुवात केली पण सलग विकेट गमावल्याने संघ 18.5 षटकात 130 धावांवर गडगडला.

गुजरात टायटन्स संघाने आयपीएलच्या या हंगामात नवा कर्णधार युवा शुभमन गिलसह खेळत आहे. गेल्या हंगामात त्याने खूप धावा केल्या होत्या. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये गेल्यानंतर गिलकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.

पाच सामने खेळल्यानंतर गुजरातने दोन जिंकले आहेत. मुंबईचा पराभव करून स्पर्धेची सुरुवात केल्यानंतर संघाला चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.