IPL 2024 : इंडियन प्रीमीयर लीग २०२४ चा २५ वा सामना राॅयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात मुंबईने बंगळुरुला ७ विकेट्सने पराभूत केले आहे. या सामन्यात आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने रोहित शर्माच्या सगळ्यात खराब रेकाॅर्डशी बरोबरी केली आहे.
ग्लेन मॅक्सवेल मुंबईविरुद्धच्या सामन्यात शून्यावरच बाद झाला. तो आयपीएल इतिहासात आत्तापर्यंत झीरोवर १७ वेळा बाद झाला आहे. अस करत त्याने रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकचे शून्यावर बाद होण्याच्या रेकाॅर्डची बरोबरी केली आहे. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक आत्तापर्यंत १७-१७ वेळा ० वर बाद झाले आहेत.
ग्लेन मॅक्सवेलला मुंबईचा गोलंदाज श्रेयस गोपालने बाद केले आहे. श्रेयसने मॅक्सवेलला एलबीडब्लू केले. त्याअगोदर मॅक्सवेलने ४ चेंडू खेळले होते परंतु तो एकही धाव काढू शकला नव्हता.
मॅक्सवेल IPL २०२४ मध्ये तिसऱ्यांदा ० वर आऊट झाला आहे. त्याने या हंगामात आरसीबीकडून ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी ३ सामन्यात तो ० वर बाद झाला आणि तीन सामन्यात फक्त ३२ धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या यादीत राशीद खान, पीयूष चावला, सुनील नरेन, मनदीप सिंह हे ४ खेळाडू दूसऱ्या क्रमांकावर आहेत. हे १५ वेळा शून्यावर बाद झाले आहेत. तर अंबाती रायडू आणि मनीष पांडे १४ वेळा ० वर आऊट झाले आहेत.
दरम्यान या सामन्यात हार्दिकने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना RCB ने १९७ धावांचे आव्हान MI पुढे ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने १५.३ षटकातच ते पुर्ण केले. सूर्यकुमार यादवने १९ चेंडूत ५२ धावा करत मुंबईच्या यशात महत्त्वपुर्ण भुमिका बजावली.
मुंबई विरुद्ध बंगळुरू या सामन्यात मुंबईने ७ विकेट्सने विजय मिळवत गुणतालिकेत आपल्या २ विजयांसह सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर आरसीबी आपल्या पाचव्या पराभवानंतर नवव्या स्थानावर घसरली आहे.
मुंबई आपला पूढचा सामना १४ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळणार आहे. तर आरसीबी आपला पूढचा सामना १५ एप्रिलला सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध खेळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.