IPL 2024 : लोकसभा निवडणूक असली तरी आयपीएल भारतातच होणार?

IPL 2024 Lok Sabha Election
IPL 2024 Lok Sabha Election esakal
Updated on

IPL 2024 Lok Sabha Election : भारतासाठी 2024 हे वर्ष खूप महत्वाचं आहे. क्रिकेटच्या दृष्टीकोणातून देखील आणि राजकारणाच्या दृष्टीकोणातून देखील हे वर्ष हॅपनिंगचं असणार आहे. भारतात एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आयपीएलचा हंगाम हा 2009 प्रमाणे इतर देशात शिफ्ट होण्याची शक्यता आहे.

आयपीएलचे चेअरमन अरूण सिंह ठाकूर मात्र आयपीएलचा यंदाचा हंगाम हा भारतातच आयोजित करण्याबाबत आशावादी आहेत. जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, अरूण ठाकूर म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीचा आयपीएलवर परिणाम होणार नाही.

IPL 2024 Lok Sabha Election
ICC World Cup 2023 : टीम इंडियालातील स्टार खेळाडूंना मिळणार ब्रेक; न्यूझीलंड सामन्यानंतर...

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी 20 लीग आहे. बीसीसीआची सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. बोर्डाने एप्रिल मे महिन्यात आयपीएलचे आयोजन करण्यासाठी वर्ल्डकपची देखील तारीख बदलली आहे.

बीसीसीआयकडे आयपीएल 2024 चा हंगाम भारतातच आयोजित कण्यासाठी पुरेसा वेळ आहे. जर तरीही आयपीएलचा हंगाम भारतात होऊ शकला नाही तर बीसीसीआयच्या समोर दक्षिण आफ्रिका आणि युएईचा पर्याय उपलब्ध आहे.गजत

IPL 2024 Lok Sabha Election
Ind vs Nz Pitch Report : जो जिंकेल तो एक नंबर, धरमशाला मधील खेळपट्टीवर कुणाचा चालणार सिक्का?

अरूण ठाकूर करत आहेत प्लॅनिंग?

आयपीएल 2009 चा हंगाम लोकसभेच्या निवडणुकीमुळे दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला. 2014 मध्ये देखील आयपीएलचे काही सामने युएईमध्ये खेळवण्यात आले. लोकसभेच्या निवडणुकीमुळे जवळपास 20 ते 25 सामने हे युएईमध्ये खेळवण्यात आले. कोरोनामुळे 2020 चा आयपीएल हंगाम युएईमध्ये झाला. या दोन देशांनी आयपीएलमुळे चांगलाच महसूल गोळा केला.

मात्र आयपीएल चेअरमन अरूण ठाकूर यांना आयपीएल हे विदेशात खेळवले जावे असे वाटत नाही. त्यांनी आतापासूनच आयपीएल भारतात आयोजित करण्याचं प्लॅनिंग सुरू केलं आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.