उद्घाटन सोहळा ते शिवम दुबेचा CSK साठी विजयी चौकार, असा होता IPL 2024 चा पहिला दिवस, पाहा एका क्लिकवर

IPL 2024, CSK vs RCB: आयपीएल 2024 स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळ्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना पार पडला. पहिल्या दिवसाचे पाहा हायलाईट्स.
IPL 2024 | CSK vs RCB
IPL 2024 | CSK vs RCBX/IPL
Updated on

IPL 2024, CSK vs RCB: इंडियन सुपर लीग 2024 स्पर्धेला शुक्रवारी दणक्यात सुरुवात झाली. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघात सामना पार पडला.

या सामन्यात गतविजेत्या चेन्नईने 6 विकेट्सने विजय मिळवत 17 व्या हंगामाची विजयी सुरुवात केली. दरम्यान, आयपीएलच्या या 17 व्या हंगामाचा पहिला दिवस कसा होता, थोडक्यात जाणून घेऊ.

पहिल्या दिवशी चेपॉक स्टेडियमवर उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटन सोहळ्यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचे परफॉर्मन्स पाहायला मिळाले, तर सोनू निगम आणि एआर रेहमान यांच्याकडून सुमधूर गाणीही ऐकायला मिळाली.

IPL 2024 | CSK vs RCB
‘धोनी IPL 2024 मध्ये सर्व सामने खेळणार नाही...' सिक्सर किंग गेलच्या वक्तव्याने उडाली खळबळ

याच उद्घाटन सोहळ्यातनंतर चेन्नईचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसही स्टेजवर आले. ऋतुराजने गतवर्षीचा विजेता म्हणून आयपीएल ट्रॉफी स्टेजवर आणली. यासह आयपीएल 2024 चे उद्धाटन झाले.

यानंतर बेंगळुरूने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगल्या सुरुवातीनंतरही मधल्या षटकात बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली होती. मात्र अनुज रावत (४८) आणि दिनेश कार्तिक (38) यांनी 95 धावांची भागीदारी करत बेंगळुरुला 20 षटकात 6 बाद 173 धावांपर्यंत पोहोचवले. चेन्नईकडून मुस्तफिजूरने 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर मिड इनिंगमध्ये डीजे एक्सवेलचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला.

IPL 2024 | CSK vs RCB
IPL मध्ये आज 'डबल हेडर'चा तडाखा! BCCI ने करारातून हकालपट्टी केल्यानंतर अय्यरला स्वतःला सिद्ध करण्याची संधी

यानंतर 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला उतरलेल्या चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्रने चांगली सुरुवात केली. परंतु, ऋतुराज लवकर बाद झाल्यानंतर रचिनने आक्रमक खेळ केला. त्याने चेन्नईकडून 15 चेंडूत सर्वाधिक ३७ धावा केल्या.

याशिवाय चेन्नईसाठी अजिंक्य रहाणे (27), डॅरिल मिचेल (22), शिवम दुबे (34) आणि रविंद्र जडेजा (25) या सर्वांनीच छोटेखानी खेळी करत महत्त्वाचे योगदान दिले. 19 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दुबेने चौकार ठोकत चेन्नईचा विजय निश्चित केला. त्याच्यासह जडेजा नाबाद राहिला. बेंगळुरुकडून कॅमेरॉन ग्रीनने 2 विकेट्स घेतल्या.

चेन्नईच्या या विजयासह आयपीएलचा पहिला दिवस संपला. आयपीएलचा या हंगामात एकूण 74 सामने पाहायला मिळणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.