MI vs SRH IPL Playoffs : आयपीएल सध्या ज्या टप्प्यावर आहे, तेथे प्लेऑफच्या दृष्टिकोनातून प्रत्येक सामना महत्त्वाचा बनला आहे. विशेषत: पॉइंट टेबलमध्ये टॉप-6 मध्ये असलेल्या संघांसाठी. असाच एक संघ म्हणजे सनरायझर्स हैदराबाद.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणारा हैदराबादचा संघ 12 गुणांसह टॉप-4 मध्ये आहे. पण एसआरएचचे प्लेऑफमधील स्थान निश्चित झालेले नाही आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्स संघ त्यांचा खेळ खराब करू शकतात.
आयपीएल 2024 मध्ये सोमवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स 11 सामन्यांत 6 गुणांसह गुणतालिकेत 10व्या स्थानावर आहे. सर्व सामने जिंकले तरी ते 12 गुणांच्या पुढे जाऊ शकणार नाही. कारण सनरायझर्ससह 5 संघांचे 12 किंवा अधिक गुण आहेत. याचा अर्थ मुंबई इंडियन्स आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे आणि हीच गोष्ट सनरायझर्ससाठी धोकादायक ठरू शकते.
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह हे मुंबई इंडियन्स संघातील क्रिकेटपटू आहेत. ज्यांना या महिन्यात टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे.
मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्सशी होईल तेव्हा रोहित, पांड्या, सूर्या हे मोठी खेळी खेळू शकतात कारण त्यांना वर्ल्ड कपपूर्वी आत्मविश्वास वाढवायचा असेल. हे खेळाडू कोणत्याही भीतीशिवाय मैदानात खेळू शकतात कारण आता मुंबईकडे गमावण्यासारखे काहीच नाही. यातील दोन फलंदाजही फॉर्ममध्ये आले तर सनरायझर्ससाठी जिंकणे हे स्वप्नच राहू शकते. आणि गोलंदाजीत बुमराह पूर्ण फॉर्मात आहे.
सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत फक्त 10 सामने खेळले आहेत. उर्वरित 4 सामने जिंकल्यास ते 20 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. जर दोन सामने हरला तर 16 गुणांवर थांबू शकतो. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्सने यापूर्वीच 16 गुण मिळवले आहेत. अशा परिस्थितीत सनरायझर्सला मोठा धक्का बसू शकतो. कारण चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स देखील येथे पोहोचू शकतात.
जर एकापेक्षा जास्त संघांचे 16 गुण झाले तर मुद्दा नेट रन रेटवर अडकेल. समसमान गुणांसह नेट रन रेटमुळे कोणताही संघ प्लेऑफमधून बाहेर पडू इच्छित नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा पराभव करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद सर्वतोपरी प्रयत्न करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.