IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

IPL playoff scenarios: आयपीएल 2024 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा सनरायझर्स हैदराबाद तिसरा संघ ठरला आहे. त्यामुळे आता एकच जागा प्लेऑफमध्ये बाकी आहे.
IPL Playoffs
IPL PlayoffsSakal
Updated on

IPL 2024 playoff scenarios: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत गुरुवारी (16 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघात सामना होणार होता. मात्र हैदराबादला गुरुवारी सातत्याने पावसाची धार सुरू असल्याने हा सामना रद्द करण्यात आला.

या सामन्यात एकही चेंडूचा खेळ झाला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना एक-एक पाँइंट वाटून देण्यात आला. यामुळे आता हैदराबादचे 15 पाँइंट्स झाल्याने त्यांनी प्लेऑफचे तिकीट मिळवले.

त्यामुळे आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेळ करणारा हैदराबाद तिसरा संघ ठरला. हैदराबादपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनीही प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता केवळ प्लेऑफमधील एक जागा शिल्लक आहे.

IPL Playoffs
T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

या एका जागेसाठी चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे चार संघ शर्यतीत आहेत. पण त्यातही दिल्ली आणि लखनौ यांच्यासाठी केवळ गणितीय समीकरणानुसार हे आव्हान कायम आहे. कारण दिल्लीचे सर्व 14 साखळी सामने खेळून झाले असून त्यांचे 14 पाँइंट्स आहेत.

मात्र, त्यांचा नेट रन रेट चेन्नई आणि बेंगळुरूपेक्षा कमी आहे. तसेच लखनौचा एक सामना बाकी आहे, त्यामुळे तेही 14 पाँइंट्सपर्यंत पोहचू शकतात. पण त्यांचाही नेट रन रेट बाकी संघांपेक्षा कमी आहे.

याचमुळे सध्या सर्वाधिक चुरस चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन संघात आहे. विशेष म्हणजे हे दोन संघच त्यांचा अखेरचा साखळी सामना 18 मे रोजी खेळणार आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ निश्चित करण्यासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे.

IPL Playoffs
MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

जर या सामन्यात चेन्नईने कोणत्याही फरकाने विजय मिळवला, तरी ते प्लेऑफमध्ये थेट प्रवेश करतील. कारण जर विजय मिळवला, तर तो चेन्नईचा 8 वा विजय असेल, त्यामुळे ते 16 पाँइंट्स मिळवतील. पण जरी पराभूत झाले, तर चेन्नईला प्लेऑफची संधी असणार आहे.

मात्र, त्यांना याची काळजी घ्यावी लागेल की बंगळुरू 18 पेक्षा अधिक धावांनी किंवा 11 चेंडू राखून जिंकणार नाही. पण जर बेंगळुरूने 18 धावांनी किंवा 11 चेंडू राखून विजय मिळवला, तर बेंगळुरू प्लेऑफसाठी पात्र ठरतील. कारण मग त्यांचे आणि चेन्नई 14 पाँइंट्ससह बरोबरीवर असतील, मात्र बेंगळुरूचा नेट रन रेट चेन्नईपेक्षा चांगला असेल.

दरम्यान, चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यात होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जर या सामन्यातही पावसाचा अडथळा आला आणि सामना रद्द झाला, तर चेन्नई प्लेऑफसाठी 15 पाँइंट्ससह पात्र ठरतील, तर बेंगळुरूचे आव्हान संपेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.