IPL 2024 Points Table: हैदराबादचा राजस्थानवर 1 धावेनं विजय अन् CSK चं वाढलं टेंशन, जाणून घ्या पाँइंट्स टेलबची स्थितीत

SRH vs RR Points Table: सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 1 धावेनं मिळवलेल्या विजयानंतर प्लेऑफची शर्यत रोमांचक वळणावर आली आहे.
Sunrisers Hyderabad
Sunrisers HyderabadSakal
Updated on

IPL 2024 Points Table: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) स्पर्धत शुक्रवारी (2 मे) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना झाला.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने 1 धावेने रोमांचक विजय मिळवला. हैदराबादच्या या विजायने पाँइंट्स टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत.

हैदराबादचा हा 10 सामन्यांतील सहावा विजय होता, तर राजस्थानचा 10 सामन्यांतील दुसराच पराभव होता. दरम्यान, राजस्थान पराभवानंतरही 8 विजयासह 16 गुण मिळवत अव्वल स्थानावर कायम आहे. जर हा सामना त्यांनी जिंकला असता, तर त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के झाले असते.

Sunrisers Hyderabad
SRH vs RR: हैदराबादला मॅच जिंकून देणारा भूवीचा जबरदस्त यॉर्कर अन् काव्या मारनचं भन्नाट सेलिब्रेशन, पाहा शेवटच्या चेंडूचा थरार

तथापि, हैदराबादने मात्र हा विजय मिळवत प्लेऑफसाठी दावेदारी ठोकली आहे. त्यांचे आता 6 विजयांसह 12 गुण झाले असल्याने त्यांनी चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये चौथे स्थान मिळवले आहे.

चेन्नईने 10 सामन्यांतील 5 सामने जिंकले आहेत, तर 5 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे चेन्नई 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर घसरले आहेत.

तसेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने 9 सामन्यांतील 6 विजयांसह 12 गुण मिळवले आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या लखनौ सुपर जायंट्सने १० सामन्यांतील 6 विजयांसह 12 गुण मिळवले आहेत. दरम्यान, कोलकाता, लखनौ आणि हैदराबाद संघांचे 12 गुण असले, तरी नेट रन रेटच्या फरकानुसार त्यांचे स्थान निश्चित झाले आहे.

पाँइंट्स टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचेही चेन्नईप्रमाणेच 11 सामन्यांतील 5 विजयासह 10 गुण आहेत. पण त्यांचा नेट रन रेट चेन्नईपेक्षा कमी असल्याने ते 6 व्या क्रमांकावर आहेत.

Sunrisers Hyderabad
Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

सातव्या क्रमांकावर पंजाब किंग्स आणि आठव्या क्रमांकावर गुजरात टायटन्स आहेत. या दोन्ही संघांनी 10 सामन्यांतील 4 विजयांसह प्रत्येकी 8 विजय मिळवले आहेत.

पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स आणि दहाव्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आहे. मुंबई आणि बेंगळुरू संघांनी 10 सामन्यांतील 3 सामन्यांत विजय मिळवत 6 गुण मिळवले आहेत.

दरम्यान, अद्याप एकाही संघाचे आव्हान संपलेले नाही, परंतु, पंजाब, गुजरात, मुंबई आणि बेंगळुरूसाठी प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग खूप कठीण आहे. तसेच राजस्थानकडे सर्वात सोपा मार्ग आहे. एक विजय देखील त्यांचे स्थान आता भक्कम करू शकतो.

मात्र कोलकाता, लखनौ, हैदराबाद आणि चेन्नई यांच्यात मात्र पहिल्या 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी मोठी चुरस आहे. त्यामुळे आता कोणते 4 संघ प्लेऑफ गाठणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.