IPL 2024 : प्लेऑफच्या शर्यतीतून कोण पडणार बाहेर? 'या' संघांना सर्वाधिक धोका; पाहा Points Table

IPL 2024 Points Table Update News : आयपीएल 2024 चा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. स्पर्धा जसजशी पुढे जात आहे तसतशी प्लेऑफची शर्यतही अतिशय रोमांचक होत आहे.
IPL 2024 Points Table Update
IPL 2024 Points Table Update News Marathisakal
Updated on

IPL 2024 Points Table Update News : आयपीएल 2024 चा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. स्पर्धा जसजशी पुढे जात आहे तसतशी प्लेऑफची शर्यतही अतिशय रोमांचक होत आहे. आयपीएल 2024 मधील 24 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानचा विजय रथ थांबला. कारण या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानचा 3 गडी राखून पराभव केला.

IPL 2024 Points Table Update
RR vs GT IPL 2024 : पराभवासोबतच संजूला आणखी एक मोठा धक्का! BCCI ने घेतली मोठी ॲक्शन

राजस्थानचा या मोसमातील हा पहिला पराभव आहे. तर गुजरातचा तिसरा विजय. या पराभवानंतरही राजस्थानचे गुणतालिकेत फारसे नुकसान झाले नाही आणि संजू सॅमसनचा संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. पण संघाच्या निव्वळ धावगतीवर निश्चितच थोडासा परिणाम झाला आहे.

मोसमातील पहिल्या पराभवानंतरही राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. राजस्थानने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्स अजूनही दुसऱ्या स्थानावर आहे.

IPL 2024 Points Table Update
ICC World Cup 2027 : शिक्कामोर्तब! क्रिकेटच्या महाकुंभाचा बिगुल वाजला; 'या' आठ ठिकाणी रंगणार वर्ल्ड कपचा थरार

आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली आहे. आतापर्यंत या तिन्ही संघांनी प्रत्येकी एकच सामना जिंकला आहे. आरसीबीने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी 4 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सने 5 सामने खेळले आहेत, तर दिल्लीला 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

जर आपण मुंबई इंडियन्सबद्दल बोललो तर हार्दिक पांड्याच्या संघाने 4 सामने खेळले आहेत ज्यापैकी 3 सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या तिन्ही संघांसाठी येथे प्रत्येक सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषत: दिल्ली आणि आरसीबीला येथे दोन सामन्यांत आणखी दोन पराभव पत्करावे लागले तर त्यांच्यासाठी प्लेऑफचा मार्ग कठीण होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.