IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

IPL 2024 Points-Table: शनिवारी दिल्ली कॅपिटल्सच्या मुंबई इंडियन्सवरील आणि राजस्थान रॉयल्सच्या लखनौ सुपर जायंट्सवरील विजयानंतर आयपीएलच्या पाँइंट्स-टेबलमधील स्थिती कशी आहे, जाणून घ्या.
LSG vs RR | DC vs MI
LSG vs RR | DC vs MISakal
Updated on

IPL 2024 Points-Table: इंडियन प्रीमयर लीग 2024 स्पर्धेत शनिवारी डबल हेडर होता, म्हणजेच दोन सामने झाले.

पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 10 धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे पाँइंट्स-टेबलमध्ये बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

मुंबईसमोर आता आव्हान खडतर

दरम्यान, दिल्लीचा हा 10 सामन्यांतील 5 वा विजय होता. त्यामुळे दिल्लीचे आता 10 गुण झाले आहेत. त्यामुळे आता दिल्लीने पाँइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली असून आता ते चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर आले आहेत.

मात्र, मुंबई इंडियन्ससमोरील अडचणी मात्र वाढल्या आहेत. मुंबईला 9 सामन्यांत सहा पराभव स्विकारावे लागले आहेत, तर तीनच विजय मिळवता आले आहेत.

LSG vs RR | DC vs MI
IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

त्यामुळे आता मुंबईला जर प्लेऑफमध्ये पोहचायचे असेल, तर उर्वरित पाचही सामने जिंकावे लागतील, याशिवाय त्यांना इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या मुंबई इंडियन्स पाँइंट्स टेबलमध्ये 9 व्या क्रमांकावर आहे.

राजस्थानचे प्ले-ऑफचं तिकीट जवळपास पक्कं

दरम्यान, राजस्थानने पहिल्या 9 सामन्यांतील आठ सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता ते 16 गुणांसह अव्वल क्रमांकावर विराजमान आहेत. अजूनही त्यांना 5 सामने खेळायचे आहेत. पण आणखी एक विजयही त्यांचे प्लेऑफमधील स्थान आता निश्चित करू शकतो.

याशिवाय लखनौ सुपर जायंट्स संघाने जरी पराभव स्विकारला असला, तरी ते पाँइट्स-टेबलमध्ये ते चौथ्या क्रमांकावर कायम आहेत. आत्तापर्यंत त्यांची 9 पैकी पाच सामने जिंकले आहेत आणि चार सामने पराभूत झाले आहेत.

LSG vs RR | DC vs MI
IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

दरम्यान, त्यांचे आणि दिल्लीचे 10 गुण आहेत. परंतु, लखनौचा नेट रन रेट जास्त असल्याने ते चौथ्या क्रमांकावर आणि दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचेही 10 गुण आहेत. मात्र नेट रन रेटच्या फरकामुळे ते दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

पाँइंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स आहेत, तर सातव्या क्रमांकावर गुजरात टायटन्स आहेत. त्यांचे सध्या प्रत्येकी चार विजयांसह 8 गुण आहेत. तसेच आठव्या क्रमांकावर पंजाब किंग्स आहेत.

त्यांचे सध्या तीन विजयांसह 6 गुण आहेत. त्यापाठोपाठ मुंबई इंडियन्स आहे, तर शेवटच्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आहेत. त्यांचे दोन विजयांसह 4 गुण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.