IPL 2024 Prize Money & Awards: विजेते कोलकाताच नाही, तर हैदराबादही मालामाल; पुरस्कार विजेत्या खेळाडूंवरही धनवर्षाव

IPL 2024 Prize Money and Awards: आयपीएल 2024 मधील विजेत्या कोलकाता नाईट रायडर्ससह उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादला किती बक्षीस रक्कम मिळाली आणि कोणकोणत्या खेळाडूंना पुरस्कार मिळाले जाणून घ्या.
KKR
KKRSakal

IPL 2024 Prize Money and Awards: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत तब्बल 74 सामन्यांनंतर विजेता संघ मिळाला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाची कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाला अंतिम सामन्यात 8 विकेट्सने पराभूत करत विजेतेपेदावर नाव कोरले. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) हा सामना झाला.

यंदाच्या आयपीएलसाठी तब्बल 46.5 कोटी रुपये बक्षीस रक्कम होती. यातील 20 कोटी रुपये विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला देण्यात आले, तर उपविजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघाला 12.5 कोटी रुये देण्यात आले.

आयपीएल 2024 मधील सर्वोत्तम खेळाडू (Most Valuable Player) सुनील नारायण ठरला. त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. विशेष म्हणजे रविवारी त्याचा वाढदिवसही होता. त्याने आयपीएल 2024 मध्ये 14 सामन्यांत 488 धावा केल्या, तर 17 विकेट्सही घेतल्या.

KKR
IPL 2024 Final Video: अय्यरची विनिंग रन अन् KRR चं गंभीरसह तिसऱ्या ट्रॉफीसाठी जोरदार सेलिब्रेशन, रसेललाही अश्रु अनावर

त्याचबरोबर विराट कोहलीला सर्वाधिक 741 धावा करण्यासाठी ऑरेंज कॅप देण्यात आली, तर सर्वाधिक 24 विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलला पर्पल कॅप देण्यात आली. सनरायझर्स हैदराबाद संघाने फेअर प्ले पुरस्कारही जिंकला. या विजेत्यांनाही प्रत्येकी 10 लाखांचे बक्षीस देण्यात आले.

आयपीएल 2024 मधील पुरस्कार विजेते आणि बक्षीस रक्कम

  • अंतिम सामन्यातील पुरस्कार

अंतिम सामन्यातील सामनावीर - मिचेल स्टार्क (कोलकाता नाईट रायडर्स) - 5 लाख

अंतिम सामन्यातील इलेक्ट्रिक स्ट्रायकर - वेंकटेश अय्यर (कोलकाता नाईट रायडर्स) - 1 लाख

अंतिम सामन्यातील सर्वाधिक चौकार - रेहमनुल्लाह गुरबाज (कोलकाता नाईट रायडर्स) - 1 लाख

अंतिम सामन्यातील सर्वाधिक षटकार - वेंकटेश अय्यर (कोलकाता नाईट रायडर्स) - 1 लाख

अंतिम सामन्यातील अल्टिमेट फँटेसी प्लेअर - मिचेल स्टार्क (कोलकाता नाईट रायडर्स) - 1 लाख

सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा गोलंदाज - हर्षित राणा (कोलकाता नाईट रायडर्स) - 1 लाख

KKR
IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध
  • आयपीएल 2024 हंगामाचे पुरस्कार

विजेता - कोलकाता नाईट रायडर्स (20 कोटी)

उपविजेता - सनरायझर्स हैदराबाद (12.5 कोटी)

आयपीएल 2024 हंगामातील उदयोन्मुख खेळाडू - नितीश रेड्डी (सनरायझर्स हैदराबाद) - 10 लाख

आयपीएल 2024 हंगामातील इलेक्ट्रिक स्ट्रायकर - जॅक-फ्रेझर मॅकगर्क (दिल्ली कॅपिटल्स) - 10 लाख

आयपीएल 2024 हंगामातील अल्टिमेट फँटेसी प्लेअर - सुनील नारायण (कोलकाता नाईट रायडर्स) - 10 लाख

आयपीएल 2024 हंगामातील व्हॅल्युएबल प्लेअर (मालिकावीर) - सुनील नारायण (कोलकाता नाईट रायडर्स) - 10 लाख

आयपीएल 2024 हंगामातील सर्वाधिक चौकार - ट्रेविस हेड (सनरायझर्स हैदराबाद, 64 चौकार) - 10 लाख

आयपीएल 2024 हंगामातील सर्वाधिक षटकार - अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद, 42 षटकार) - 10 लाख

आयपीएल 2024 हंगामातील सर्वोत्तम झेल - रमणदीप सिंग (कोलकाता नाईट रायडर्स) - 10 लाख

ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) - विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - 10 लाख

पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) - हर्षल पटेल (पंजाब किंग्स) - 10 लाख

आयपीएल 2024 हंगामातील फेअर प्ले - सनरायझर्स हैदराबाद - 10 लाख

आयपीएल 2024 हंगामातील सर्वोत्तम खेळपट्टी आणि मैदान - राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद - 50 लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com