IPL 2024 RCB vs CSK Qualification scenarios : यंदाच्या आयपीएलमधील साखळी सामन्यांचा अखेरचा टप्पा सुरू झालेला असतानाही कोलकता नाईट रायडर्स हा एकमेव संघ सोमवारपर्यंत तरी प्लेऑफसाठी पात्र ठरलेला आहे. अजूनही इतर तीन जागांसाठी सहा संघ शर्यतीत आहेत. सलग पाच विजय मिळवून बंगळूर संघाने आपली दावेदारी ठोस करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत; परंतु शनिवारी त्यांचा गतविजेत्या चेन्नईविरुद्ध सामना होत आहे आणि तो दोघांसाठी बाद फेरीसारखाच असणार आहे.
गुणतक्त्यातील सध्याची स्थिती आणि फॉर्म लक्षात घेता राजस्थान आणि हैदराबाद यांना प्लेऑफ गाठण्याची अधिक संधी आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या राजस्थानचे १२ सामन्यांतून १६ तर चौथ्या स्थानावरील हैदराबादचे १२ सामन्यांतून १४ गुण झाले आहेत. राजस्थानला उर्वरित दोन सामन्यांतून एक विजय पुरेसा ठरू शकेल. तर हैदराबादसाठी दोन्ही सामने जिंकणे त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्याएवढेच किमान दुसऱ्या स्थानावर राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण पहिल्या दोन संघांत कॉलिफायर-१ सामना होतो आणि त्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत जातो. मात्र, पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी अजून एक संधी मिळत असते.
राजस्थान आणि हैदराबाद यांचे प्लेऑफमधील स्थान अपेक्षित धरले तर चौथ्या जागेसाठी चेन्नई आणि बंगळूर यांच्यात चुरस असेल. गतविजेत्या चेन्नईचा संघ १३ सामन्यांत १४ गुणांसह तिसऱ्या तर बंगळूरचा संघ १३ सामन्यांतून १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांचे आव्हान अगोदरच संपुष्टात आलेले आहे; पण हे संघ त्यांचे अखेरचे सामने शिल्लक असलेल्या संघासाठी अथडळे ठरू शकतात. येथून पुढे जो संघ पराभूत होईल, त्यांचेही आव्हान संपुष्टात येणार आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात बंगळूर संघाने दिल्लीवर ४७ धावांनी विजय मिळवून आपल्या निव्वळ सरासरीमध्ये सुधारणा (०.३८७) केली तरीही ते चेन्नईपेक्षा (०.५२८) काहीसे मागे आहेत.
शनिवारच्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला तर ते प्लेऑमध्ये जातील मात्र पराभूत झाले तरी त्यांना संधी असेल कारण बंगळूरसाठी हा सामना १८ किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी (प्रथम फलंदाजीत साधारणतः २०० धावा केल्यास) जिंकावा लागेल किंवा चेन्नईसमोर २०१ धावांचे लक्ष ठेवल्यास त्यांना अंदाजे ११ चेंडू राखून पराभूत करावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.