Hyderabad Weather Forecast : 'या' कारणामुळे SRH vs LSG सामना होणार रद्द अन् CSK टॉप-4 मधून जाणार बाहेर?

Hyderabad latest Weather Forecast SRH vs LSG IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Hyderabad latest weather forecast
Hyderabad latest weather forecastsakal
Updated on

Hyderabad latest weather forecast : आयपीएल 2024 मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

मात्र, या सामन्यावर पावसाची छाया पसरली. पावसामुळे संपूर्ण सामना रद्द करावा लागला तर चेन्नई सुपर किंग्जला नुकसान सहन करावे लागू शकते. तर आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सला त्याचा फायदा होऊ शकतो.

Hyderabad latest weather forecast
Sanju Samson Fined: अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

SRH विरुद्ध LSG सामन्यावर पावसाचे सावट

हैदराबादमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला आणि आज संध्याकाळी सहाच्या सुमारास पावसाची शक्यता आहे. सामन्याच्या आधी पाऊस पडण्याची सुमारे 32% शक्यता आहे आणि जर परिस्थिती बिघडली तर सामना रद्द केला जाऊ शकतो.

Hyderabad latest weather forecast
Jasprit Bumrah : मुंबईचा खेळ संपला तरी... बुमराह ‘ऑन ड्युटी २४ तास’, वर्ल्ड कपच्या तोंडावर पण मिळणार नाही विश्रांती

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. अशा स्थितीत सनरायझर्स आणि लखनौचे प्रत्येकी 13 गुण होतील. याचा सर्वाधिक फायदा लखनौ सुपर जायंट्सला होणार असून ते टॉप-4 मध्ये येतील. तर सनरायझर्स हैदराबाद देखील टॉप 4 मध्ये आपले स्थान मजबूत करेल.

याशिवाय दिल्ली कॅपिटल्सलाही मोठा फायदा होऊ शकतो. त्यांचे सध्या 12 गुण आहेत आणि जर त्यांनी पुढील सामना जिंकला तर दिल्लीचे 14 गुण होतील. आणि अशा स्थितीत ते या दोन्ही संघांच्या पुढे जाऊन टॉप-4 मध्ये आपले स्थान पक्के करतील. या पावसाचा फायदा आरसीबीलाही होणार आहे.

Hyderabad latest weather forecast
Rohit Sharma : फक्त क्रिकेट, क्रिकेट अन् क्रिकेट होतंय... रोहितला आता विश्रांतीची गरज; दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

हा सामना रद्द झाल्यास चेन्नई सुपर किंग्जचे सर्वात मोठे नुकसान होऊ शकते. त्यांचे सध्या 12 गुण आहेत आणि ते तिसऱ्या स्थानावर आहेत. सामना रद्द होताच, लखनौ आणि हैदराबाद दोघांचे प्रत्येकी 13 गुण होतील आणि CSK पुन्हा टॉप-4 मधून बाहेर पडेल. मात्र, चेन्नई सुपर किंग्ज त्यांचा पुढचा सामना जिंकून टॉप-4 मध्ये परत येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.