RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

IPL 2024 RCB Playoffs Scenario : आरसीबीने पॉइंट टेबलवर घेतली मोठी झेप
RCB Playoffs Scenario IPL 2024 News Marathi
RCB Playoffs Scenario IPL 2024 News MarathiSAKAL
Updated on

RCB Playoffs Scenario IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात खूपच खराब झाली होती. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आरसीबीला सलग पराभवाला सामोरे जावे लागले. घरच्या मैदानावरही संघाचा पराभव झाला. त्यानंतर आता आरसीबी पुन्हा विजयी मार्गावर आहे.

आरसीबीसाठी प्लेऑफचा मार्ग सोपा नसला तरी, संघ अद्याप प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. काल चार मे रोजी 52 व्या सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा 4 गडी राखून पराभव केला. या हंगामात आरसीबीचा गुजरातवरचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह आरसीबीने पॉइंट टेबलवर मोठी झेप घेतली आहे.

RCB Playoffs Scenario IPL 2024 News Marathi
T20 WC 2024 IND Vs PAK : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याची जबरदस्त क्रेझ, १ तिकीट इतक्या लाखांना...

आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 11 लीग सामने खेळले आहेत. त्यापैकी फाफ डू प्लेसिसच्या संघाने 4 जिंकले आहेत आणि 7 सामने गमावले आहेत. 4 सामने जिंकल्यानंतर आता आरसीबी संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. येथे आरसीबीला त्यांचे सर्व सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील.

तसेच, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली आणि हैदराबादसारख्या संघांच्या पराभवासाठी शुभेच्छा द्याव्या लागतील. जर आपण आरसीबीच्या नेट रन रेटबद्दल बोललो तर तो -0.049 आहे. सध्या मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज सारखे संघ पॉइंट टेबलमध्ये आरसीबीच्या खाली आहेत.

RCB Playoffs Scenario IPL 2024 News Marathi
T20 WC 2024 IND Vs PAK : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याची जबरदस्त क्रेझ, १ तिकीट इतक्या लाखांना...

आरसीबीविरुद्ध गुजरात टायटन्सच्या पराभवाने मोठा धक्का बसला आहे. आता त्यांच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपल्या आहेत. या संघाने 11 सामने खेळून केवळ 4 विजय नोंदवले आहेत. उर्वरित 3 सामने जिंकूनही गुजरात केवळ 14 गुणांपर्यंत पोहोचेल जे प्लेऑफसाठी पुरेसे ठरणार नाही. कारण त्यांचा नेट रन रेट खुपच खराब आहे. 8 सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएल 2024 मध्ये प्रवास संपला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.