IPL 2024 : राजस्थान रॉयल्सने जो रूटसह 9 खेळाडूंना केलं रिलीज, LSGमधून या खेळाडूंना डच्चू

आयपीएल 2024 साठीच्या ऑक्शनपूर्वी रविवारी सर्व संघानी आपल्या रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे
ipl 2023 rajasthan royals
ipl 2023 rajasthan royalssakal
Updated on

आयपीएल 2024 साठीच्या ऑक्शनपूर्वी रविवारी सर्व संघानी आपल्या रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. राजस्थान रॉयल्सने या वर्षी ऑक्शनच्या आधी नऊ खेळाडूंना रिलीज केलं असून 17 खेळाडूंना रिटेन केलं आहे.

रॉयल्सने सहा खेळाडूंना केलं रिलीज

राजस्थान रॉयल्सने यावर्षी तीन परदेशी खेळाडूंना रिलीज केले आहे. जो रूटने यंदा आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय कॅरेबियन ऑलराउंडर जेसन होल्डर आणि ओबेद मॅकॉय यांनाही रिलीज करण्यात आले आहे. अब्दुल बासित, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव, एम अश्विन, केसी करिअप्पा आणि केएम आसिफ यांचाही समावेश आहे.

संघाचे क्रिकेट संचालक कुमार संगकाराने सांगितलं की या खेळाडूंना रिलीज करताना आम्हाला आनंद होत नाहीये, पण हे संघासाठी आवश्यक होते. यातील काही खेळाडू लिलावादरम्यान संघाचा भाग बनू शकतात. देवदत्त पडिक्कल यालाही मी ट्रेड केलं आहे आम्ही ट्रेड केलं केला. त्याला सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता.

कायम ठेवण्यात आलेले खेळाडू

संजू सॅमसन, जॉस बटलर, शिमरोन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फेरेरिरा, कुनाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, अॅडम जॅम्पा

रिलीज केलेले खेळाडू

जो रूट, अब्दुल बासित, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव, एम अश्विन केसी करियप्पा, के एम आसिफ

ट्रेड केलेले खेळाडू

आवेश खान (लखनऊ सुपर जायंट्स मधून राजस्थान)

देवदत्त पडिकक्ल (राजस्थान मधून लखनऊ सुपर जायंट्स)

ipl 2023 rajasthan royals
IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सकडून 11 दिग्गजांना बाहेर रस्ता; वाचा कायम ठेवलेल्या अन् रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी

लखनऊने रिलीज केले आठ खेळाडू

लखनऊने या वर्षी एका परदेशी खेळाडूसह 8 खेळाडूंना रिलीज केले आहे. डॅनियल सॅम्सव्यतिरिक्त एसएलजीने जयदेव उनाडकटलाही वगळले आहे. लखनऊने 41 वर्षीय फिरकी गोलंदाज अमित मिश्राला संघात कायम ठेवले आहे. तर, देवदत्त पडिक्कल हा ट्रेड झाल्यानंतर या संघात सामील झाला आहे.

कायम ठेवण्यात आलेले खेळाडू

केएल राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बरोनी, कायल मायर्स, मार्कस स्टोइनिस , दीपक हुड्डा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन उल हक, कृणाल पांड्या, युद्धवीर सिंह, प्रेरक मांकड, यश ठाकुर, अमित मिश्रा, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान.

रिलीज केलेले खेळाडू

जयदेव उनादकट, डॅनियल सॅम्स, मनन वोहरा, स्वपनिल सिंह, करण शर्मा, अर्पित गुलेरिया, सुर्यंश शेड, करुण नायर

ट्रेड केलेले खेळाडू

देवदत्त पडिक्कल (राजस्थान रॉयल्स मधून लखनऊ)

ipl 2023 rajasthan royals
IPL 2024 : मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूंना केलं रिटेन; तर अर्चर, जॉर्डनसह ११ जण रिलीज, पाहा यादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.