सुपर संडेमध्ये आज (24 मार्च) इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानात म्हणजेच सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 20 धावांनी विजय मिळवला. यासह 17 व्या हंगामाची विजयी सुरुवात केली आहे.
या सामन्यात राजस्थानने लखनौसमोर 194 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौला 20 षटकात 6 बाद 173 धावाच करता आल्या. निकोलस पूरन ६४ धावांची नाबाद खेळी केली. 41 चेंडूत केलेल्या या खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले.
तसेच केएल राहुलने 58 धावांची खेळी केली. राजस्थानकडून गोलंदाजी करताना ट्रेंड बोल्टने 2 विकेट्स घेतल्या, तर नांद्रे बर्गर, आर अश्विन, युजवेंद्र चहल आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
केएल राहुलला बाद झाल्यानंतर मार्कस स्टॉयनिस फलंदाजीला आला. परंतु, त्याला खास काही करता आले नाही. 18 व्या षटकात आर अश्विनने त्याला ३ धावांवर बाद केले. त्याचा झेल ध्रुव जुरेलने घेतला. या दरम्यान, निकोलस पूरनने अर्धशतकी खेळी केली.
अर्धशतकानंतरही केएल राहुल लखनौचा डाव पुढे नेण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याला 17 व्या षटकात संदीप शर्माने माघारी धाडेल. त्याच्या रुपात लखनौने पाचवी विकेट गमावली. 17 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले.
संदीपने टाकलेल्या फुलटॉसवर राहुलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु ध्रुव जुरेलने त्याचा सहज झेल घेतला. त्यामुळे केएल राहुल 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 44 चेंडूत 58 धावा करून माघारी परतला.
लखनौचा कर्णधार केएल राहुलने सुरुतीच्या विकेट्सनंतर निकोलस पूरनबरोबर फलंदाजी करताना संघाचा डाव सावरला. त्याने पाचव्या विकेटसाठी पूरनसह अर्धशतकी भागीदारी करण्याबरोबरच त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. केएल राहुलने 35 चेंडूत त्याचे अर्धशतक केले.
लखनौने 14 षटकात 4 बाद 129 धावा केल्या आहेत. विजयासाठी लखनौला 36 चेंडूत 65 धावांची गरज आहे, तर राजस्थानला विजयासाठी 6 विकेट्सची गरज आहे.
लखनौकडून कर्णधार केएल राहुलने एक बाजू सांभाळलेली असतानाच दुसऱ्या बाजूने मात्र सातत्याने विकेट्स जात आहे. अशातच त्याची दिपक हुडाबरोबर भागीदारी रंगत असतानाच राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने आठव्या षटकात युजवेंद्र चहलकडे चेंडू सोपवला.
चहलनेही या षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर दिपक हुडाला चकवले. हुडा मोठा फटका मारण्याच्या नादात डीप मिडविकेटला ध्रुव जुरेलकडे झेल देत बाद झाला. त्याने 13 चेंडूत 26 धावा केल्या. 8 षटकात लखनौने 4 बाद 61 धावा केल्या आहेत.
पडिक्कल बाद झाल्यानंतर आयुष बडोनी फलंदाजीला आला होता. परंतु, त्यालाही फार काळ टिकून राहता आले नाही. इम्पॅक्ट प्लेअर नांद्र बर्गरने त्याला 1 धावेवरच माघारी धाडले.
बोल्टने पहिल्या षटकात क्विंटन डी कॉकला बाद केल्यानंतर सामन्यातील तिसऱ्या आणि त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात देवदत्त पडिक्कलला माघारी धाडले. याच तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर बोल्टचा वेगवान चेंडू पडिक्कलच्या हेल्मेटवर आदळला होता.
त्यामुळे फिजिओला मैदानात यावे लागले. पण तो ठिक असल्याने त्याने खेळणे कायम केले. मात्र पुढच्याच चेंडूवर बोल्टने पडिक्कलला शुन्यावर त्रिफळाचीत केले.
पहिल्या तीन षटकात लखनौला 2 बाद 11 धावा करता आल्या आहेत.
राजस्थानने दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनौला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. राजस्थानकडून ट्रेंट बोल्टने पाचव्या चेंडूवर सलामीवीर क्विंटन डी कॉकला माघारी धाडले. डी कॉक इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सामील झालेल्या नांद्रे बर्गरच्या हातात झेल देत 4 धावांवर बाद झाला.
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 193 धावा केल्या आहेत. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपली. त्याने 52 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 6 षटकार मारले. अखेरीस त्याच्यासह ध्रुव जुरेल 12 चेंडूच 20 धावा करून नाबाद राहिला.
लखनौकडून गोलंदाजी करताना या सामन्यात नवीन-उल-हकने 4 षटकात 41 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर मोहसिन खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
रियान पराग बाद झाल्यानंतर राजस्थानकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी शिमरॉन हेटमायर उतरला होता. मात्र, त्याला रवी बिश्नोईने फार काळ टिकू न देता 17 व्या षटकात बाद केले. त्याचा झेल यष्टीरक्षक केएल राहुलने घेतला. हेटमायर 5 धावा करून माघारी परतला. राजस्थानने 17 षटकात 4 बाद 158 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला उतरलेल्या रियान परागचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. त्याला लखनौच्या नवीन उल हकने १५ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर दीपक हुडाच्या हातून झेलबाद केले.
परागने 29 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 43 धावांची खेळी केली. तसेच त्याने राजस्थानसाठी कर्णधार संजू सॅमसनबरोबर 93 धावांची भागीदारी केली. राजस्थानने 15 षटकात 3 बाद 143 धावा केल्या आहेत.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने 33 चेंडूत 50 धावा करत आयपीएलमधील 21 वे अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याने रियान परागसह राजस्थानचा डाव सावरताना अर्धशतकी भागीदारीही केली आहे. त्यामुळे राजस्थान 13 षटकात 2 बाद 119 धावांपर्यंत पोहचला आहे.
राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का दुसऱ्याच षटकात 13 धावांवर बसला आहे. नवीन उल हकने जोस बटलरला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. त्याला 11 धावा करता आल्या. सध्या यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन क्रीजवर आहेत.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर
आयपीएल 2024 च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने संघाचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यातून देवदत्त पडिक्कलने लखनौकडून पदार्पण केले आहे. त्यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.
इंग्लंडविरुद्ध जानेवारी 2024 मध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर केएल राहुल दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर गेला होता. त्यानंतर आता तो आयपीएल 2024 मधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. तो या आयपीएलमध्ये लखनौ संघाचे नेतृत्व करत आहे.
IPL 2024 Rajasthan Royals vs Lucknow Super Giants : सुपर संडेमध्ये आज इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होत आहे. हा सामना राजस्थानच्या होम ग्राउंड सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना लखनौ समोर 194 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यापूर्वी दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्सने 2 सामने आणि लखनौ सुपर जायंट्सने 1 सामना जिंकला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.