IPL 2024 Schedule: निवडणूकीच्या धामधुमीत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे शेड्युल जाहीर, पाहा एका क्लिकवर

IPL 2024 Schedule: आयपीएलच्या 17 व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील शेड्युल जाहीर झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात अंतिम सामन्यापर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
IPL 2024 Schedule
IPL 2024 ScheduleSakal
Updated on

IPL 2024 Schedule: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक घोषित झाले आहे. आयपीएलचा हा 17 वा हंगाम असून 22 मार्चपासून या हंगामाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी 17 व्या हंगामातील पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले होते. यामध्ये 22 मार्च ते 7 एप्रिलपर्यंतच्या सामन्यांचा समावेश होता.

आता त्यापुढे अंतिम सामन्यापर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अंतिम सामना 26 मे 2024 रोजी चेन्नईला खेळवला जाणार आहे. तसेच प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी आणि एलिमिनेटर सामना 22 मे रोजी अहमदाबादला खेळवला जाणार आहे. तसेच 24 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामनाही चेन्नईला खेळवला जाणार आहे.

प्लेऑमधील सर्व सामने संध्याकाळी 7.30 वाजता चालू होणार आहेत.

IPL 2024 Schedule
Rohit Sharma Holi: लालेलाल हिटमॅन...! मुंबई इंडियन्सने शेअर केला धुळवडीचा खास Video

आयपीएलमध्ये बऱ्याचदा गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर अंतिम सामना खेळवण्यात येतो. त्यामुळे यंदा गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. यंदाच्या हंगामात साखळी फेरीत 70 सामने आणि प्लेऑफचे 4 सामने असे मिळून 74 सामने खेळवले जाणार आहेत.

लोकसभा निवडणूकांमुळे यंदा आयपीएलचे वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर केले गेले आहे. काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात होणार असल्याचे जाहीर केले आहे.

19 एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे. जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोकसभेसाठी मतदान प्रतिक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे निवडणूकीचे टप्पे आणि मतदान या गोष्टी लक्षात घेत आयपीएल 2024 च्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

IPL 2024 Schedule
IPL होतंय Predictable? पहिल्या 5 सामन्यातील विजेत्यांमध्ये एक गोष्ट आहे कॉमन!

डबल हेडर आणि वेळ

दुसऱ्या टप्प्यात एकूण 7 डबल हेडर म्हणजे एका दिवशी दोन सामने खेळवले जाणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना दुपारी 3.30 वाजता चालू होईल, तर दुसरा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चालू होईल. इतर दिवशी एकच सामना होणार असल्याने हे सामने संध्याकाळी 7.30 वाजता चालू होतील.

याशिवाय यंदा होम - अवे या पद्धतीनेच सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ साखळी फेरीत आपल्या घरच्या आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात सामने खेळताना दिसणार आहे.

दरम्यान, यातील पंजाब किंग्स संघाचे 5 मे आणि 9 मे रोजी होणारे घरचे सामने धरमशाला येथे होतील, तर राजस्थान रॉयल्सचे 15 मे आणि 19 मे रोजी होणारे घरचे सामने गुवाहाटीला होतील.

आयपीएल 2024 स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

  • 22 मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, चेन्नई (संध्या. 7.30 वाजता)

  • 23 मार्च - पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मोहाली (दु. 3.30 वाजता)

  • 23 मार्च - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता (संध्या.7.30 वाजता)

  • 24 मार्च - राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, जयपूर (दु. 3.30 वाजता)

  • 24 मार्च - गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, अहमदाबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 25 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स, बंगळुरू (संध्या. 7.30वाजता)

  • 26 मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, चेन्नई (संध्या. 7.30 वाजता)

  • 27 मार्च - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 28 मार्च - राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, जयपूर (संध्या. 7.30 वाजता)

  • 29 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बेंगळुरू (संध्या. 7.30 वाजता)

  • 30 मार्च - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, लखनौ (संध्या. 7.30 वाजता)

  • 31 मार्च - गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद (दु. 3.30 वाजता)

  • 31 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, विशाखापट्टणम (संध्या. 7.30 वाजता)

  • 1 एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई (संध्या. 7.30 वाजता)

  • 2 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, बंगळुरू (संध्या. 7.30 वाजता)

  • 3 एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, विशाखापट्टणम (संध्या. 7.30 वाजता)

  • 4 एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, अहमदाबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 5 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 6 एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, जयपूर (संध्या. 7.30 वाजता)

  • 7 एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई (दु. 3.30 वाजता)

  • 7 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, लखनौ (संध्या. 7.30 वाजता)

  • 8 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई (संध्या. 7.30 वाजता)

  • 9 एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुल्लनपूर (संध्या. 7.30 वाजता)

  • 10 एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, जयपूर(संध्या. 7.30 वाजता)

  • 11 एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मुंबई (संध्या. 7.30 वाजता)

  • 12 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, लखनौ (संध्या. 7.30 वाजता)

  • 13 एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुल्लनपूर (संध्या. 7.30 वाजता)

  • 14 एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता (दु. 3.30 वाजता)

  • 14 एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, मुंबई (संध्या. 7.30 वाजता)

  • 15 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, बेंगळुरू (संध्या. 7.30 वाजता)

  • 16 एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, अहमदाबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 17 एप्रिल - कोलकाता नाईट राटडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोलकाता(संध्या. 7.30 वाजता)

  • 18 एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुल्लनपूर (संध्या. 7.30 वाजता)

  • 19 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, लखनौ (संध्या. 7.30 वाजता)

  • 20 एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली (संध्या. 7.30 वाजता)

  • 21एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, कोलकाता (दु. 3.30 वाजता)

  • 21एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, मोहाली (संध्या. 7.30 वाजता)

  • 22एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, जयपूर (संध्या. 7.30 वाजता)

  • 23एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई (संध्या. 7.30 वाजता)

  • 24एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, दिल्ली (संध्या. 7.30 वाजता)

  • 25एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, हैदराबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 26एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स, कोलकाता (संध्या. 7.30 वाजता)

  • 27 एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली (दु. 3.30 वाजता)

  • 27 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, लखनौ (संध्या. 7.30 वाजता)

  • 28 एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, अहमदबाद (दु. 3.30 वाजता)

  • 28 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई (संध्या. 7.30 वाजता)

  • 29 एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता (संध्या. 7.30 वाजता)

  • 30 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, लखनौ (संध्या. 7.30 वाजता)

  • 1 मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स, चेन्नई (संध्या. 7.30 वाजता)

  • 2 मे - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, हैदराबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 3 मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई (संध्या. 7.30 वाजता)

  • 4 मे - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स, बेंगळुरू (संध्या. 7.30 वाजता)

  • 5 मे - पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, धरमशाला (दु. 3.30 वाजता)

  • 5 मे - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ (संध्या. 7.30 वाजता)

  • 6 मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुंबई (संध्या. 7.30 वाजता)

  • 7 मे - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दिल्ली (संध्या. 7.30 वाजता)

  • 8 मे - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, हैदराबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 9 मे - पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, धरमशाला (संध्या. 7.30 वाजता)

  • 10 मे - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, अहमदाबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 11 मे - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, कोलकाता (संध्या. 7.30 वाजता)

  • 12 मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, चेन्नई (दु. 3.30 वाजता)

  • 12 मे - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, बेंगळुरू (संध्या. 7.30 वाजता)

  • 13 मे - गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, अहमदाबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 14 मे - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली (संध्या. 7.30 वाजता)

  • 15 मे - राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स, गुवाहाटी (संध्या. 7.30 वाजता)

  • 16 मे - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स, हैदराबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 17मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, मुंबई (संध्या. 7.30 वाजता)

  • 18मे - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, बेंगळुरू (संध्या. 7.30 वाजता)

  • 19मे - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स, हैदराबाद (दु. 3.30 वाजता)

  • 19मे - राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, गुवाहाटी (संध्या. 7.30 वाजता)

प्लेऑफ-

  • 21 मे - पहिला क्वालिफायर, अहमदाबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 22 मे - एलिमिनेटर, अहमदाबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 24 मे - दुसरा क्वालिफायनर, चेन्नई (संध्या. 7.30 वाजता)

  • 26 मे - अंतिम सामना, चेन्नई (संध्या. 7.30 वाजता)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()