IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

SRH vs LSG Weather Update : आयपीएल 2024 चा 57 वा सामना 8 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जाणार आहे.
SRH vs LSG Weather Update
SRH vs LSG Weather Updatesakal
Updated on

SRH vs LSG Weather Update : आयपीएल 2024 चा 57 वा सामना 8 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. प्लेऑफच्या शर्यतीचा विचार करता या दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

या सामन्याच्या निकालाचा परिणाम इतर संघांवरही होणार आहे. मात्र हैदराबादमध्ये होणाऱ्या सामन्यापूर्वी हवामानाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे ज्यामुळे दोन्ही संघांचा तणाव वाढू शकतो.

SRH vs LSG Weather Update
MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

हैदराबादमध्ये सध्या हवामान चांगले नाही आणि आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, सामन्याच्या दिवशी सकाळी हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे, परंतु सामना सुरू होण्याच्या आधी संध्याकाळी 6 वाजता पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या, सामन्याच्या आधी पाऊस पडण्याची 32% शक्यता आहे. आणि जर परिस्थिती बिघडली तर सामना रद्द होऊ शकतो किंवा खेळ सुरू होण्यास उशीर होऊ शकतो.

SRH vs LSG Weather Update
MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत!

सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत 12 गुण आणि -0.065 च्या नेट रन रेटने चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने देखील 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 12 गुण आणि -0.371 च्या नेट रन रेटने ते पाचव्या स्थानावर आहेत.

अशा परिस्थितीत हा सामना जिंकणारा संघ 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. मात्र पावसामुळे खेळ वाहून गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल आणि दोन्ही संघ 13 गुणांवर पोहोचतील. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचेल. तो सध्या 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.