IPL 2024 SRH vs MI : सामन्यात तब्बल 523 धावा! हैदराबादने मुंबईचा केला 31 धावांनी पराभव

Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians : सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात सगळे विक्रम मोडले गेले. आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् अनेक विक्रम
IPL 2024 SRH vs MI Live Score Updates Marathi News
IPL 2024 SRH vs MI Live Score Updates Marathi Newsesakal
Updated on

IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live Score :

आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने मुंबईचा 31 धावांनी पराभव केला. हैदराबादने प्रथम फंलदाजी करत 277 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला 20 षटकात 246 धावा केल्या. हैदराबादकडून हेन्री क्लासेनने सर्वाधिक 80 धावा केल्या. तर गोलंदाजीत पॅट कमिन्सने 4 षटकात 35 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. मुंबईकडून तिलक वर्माने 64 तर टीम डेव्हिडने नाबाद 42 धावा केल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याला नंतर आपल्या निर्णयाचा पश्चाताप नक्की झाला असेल. मुंबई इंडियन्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यांनी मुंबईविरूद्ध 15 व्या षटकातच 200 धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर क्लासेनने 34 चेंडूत नाबाद 80 धावा ठोकत हैदराबादला 277 धावा ठोकल्या.

पॅट कमिन्सचा कॅप्टन्सवाली बॉलिंग 

पॅट कमिन्सने आज दमदार गोलंदाजी करत 4 षटकात 8.80 च्या इकॉनॉमीने 35 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. या दमदार गोलंदाजीमुळेच फलंदाजीला एकतर्फी साथ देणाऱ्या खेळपट्टावर सनराईजर्स हैदराबादने 31 धावांनी विजय मिळवला.

टीम डेव्हिडने दमदार फलंदाजी करत सामन्यात रंगत आणली.

टीम डेव्हिडने फटकेबाजी करत सामना 12 चेंडूत 54 धावा असा आणला.

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, तिलक वर्मा बाद 

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला. 34 चेंडूत 64 धावा ठोकणारा तिलक वर्मा बाद झाला. त्याला कमिन्सने बाद केले. मुंबईला अजून विजयासाठी 30 चेंडूत 93 धावांची गरज आहे.

IPL 2024 SRH vs MI Live Score : मुंबईचाही पलटावर! 3 षटकार अर्धशतक पार

सनराईजर्स हैदराबादच्या 278 धावांचे आव्हान पार करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. इशान किशन आणि रोहित शर्माने 3 षटकात 50 धावा ठोकल्या.

IPL 2024 SRH vs MI Live Score : हैदराबादने उभारली आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या; हेड-शर्माने रचला पाया क्लासेनने चढवला कळस

हेन्री क्लासेनने 34 चेंडूत नाबाद 80 धावा करत सनराईजर्स हैदराबादला 20 षटकात 3 बाद 277 धावा ठोकल्या.

IPL 2024 SRH vs MI Live Score : हेड झाला, शर्मा झाला आता क्लासेन लागला मुंबईच्या राशीला... आरसीबचं रेकॉर्ड मोडणार?

हेड, शर्मानंतर आता हेन्री क्लासेनने धडाकेबाज फलंदाजी करत 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं. सनराईजर्स हैदराबादला 18 षटकात 3 बाद 243 पर्यंत पोहचवलं.

IPL 2024 SRH vs MI Live Score : अभिषेक शर्माने मोडला हेडचा विक्रम, हैदराबाद 13 व्या षटकातच 180 पार

अभिषेक शर्माने हेडचा विक्रम मोडत 16 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. ही हैदराबादकडून आयपीएलमध्ये केलेले सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. या झंजावाती फलंदाजीमुळे हैदराबादने 13 व्या षटकात 180 धावा केल्या.

IPL 2024 SRH vs MI Live Score : अखेर कॉट्झीने दिला दिलासा; हेडचा झंजावात रोखला

कॉट्झीने अखेर मुंबई इंडियन्सला दिलासा दिला. हेडने 24 चेंडूत 258.33 च्या स्ट्राईक रेटने 62 धावा केल्या होत्या.

IPL 2024 SRH vs MI Live Score : ट्रॅविस हेडचे वेगवान अर्धशतक; मुंबईच्या गोलंदाजांची केली धुलाई

वनडे वर्ल्डकप फायनलचा हिरो ट्रॅविस हेडने मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात देखील धडाकेबाज फलंदाजी केली. ट्रॅविस हेडने 18 चेडूत अर्धशतक पूर्ण कर हैदराबादकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला. तसेच हैदराबादला 6 षटकात 1 बाद 81 धावा करत हैदराबादच्या इतिहातालीत पॉवर प्लेमधील सर्वाधिक धावा करून दिल्या.

IPL 2024 SRH vs MI Live Score : हैदराबादच्या 3 षटकात 40 धावा; ट्रॅविस हेडची धडाकेबाज सुरूवात

ट्रॅविस हेडने आयपीएलमधील आपल्या पहिल्याच सामन्यात धडाकेबाज सुरूवात केली. पहिल्या 3 षटकात तुफान फटकेबाजी करत हेडने 10 चेंडूत 31 धावा केल्या. यामुळे हैदराबादने 3 षटकात 40 धावा केल्या आहेत. मफाकाच्या एकाच षटकात हेडने 22 धावा ठोकल्या.

सचिनच्या हातून रोहितला 200 व्या सामन्याची जर्सी 

रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सकडून 200 वा सामना खेळत आहे. रोहितला सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सची 200 लिहिलेली जर्सी देण्यात आली.

हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली 

मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने संघात एक बदल केला असून ल्युकच्या ऐवजी माफकाला संघात स्थान मिळाले आहे.

Rohit Sharma SRH vs MI : वेड्या चाहत्यांची वेडी ही माया... रोहितसाठी चाहते तीन तास उभे राहिले उन्हात

IPL 2024 SRH vs MI Live Score : हैदराबाद की मुंबई.... कोण उघडणार विजयाचे खाते... जाणून घ्या किती वाजता होणार टॉस?

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.