IPL 2024 SRH vs PBKS : दोन्ही संघांना गोलंदाजी विभागाची चिंता ; पंजाब, हैदराबाद आज तिसऱ्या विजयासाठी लढणार

पंजाब किंग्स- सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये उद्या आयपीएल लढतीचा थरार रंगणार असून दोन्ही संघ तिसऱ्या विजयासाठी लढताना दिसणार आहेत. याप्रसंगी दोन्ही संघांना गोलंदाजी विभागाची चिंता सतावत आहे.
IPL 2024 SRH vs PBKS
IPL 2024 SRH vs PBKS sakal
Updated on

मुल्लानपूर : पंजाब किंग्स- सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये उद्या आयपीएल लढतीचा थरार रंगणार असून दोन्ही संघ तिसऱ्या विजयासाठी लढताना दिसणार आहेत. याप्रसंगी दोन्ही संघांना गोलंदाजी विभागाची चिंता सतावत आहे. पंजाबच्या संघाला अखेरच्या षटकांत प्रभावी मारा करण्यात अपयश येत आहे, तर हैदराबादचा संघ सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये स्वैर गोलंदाजी करीत आहे. आगामी लढतींमध्ये दोन्ही संघ यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील.

हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत विक्रमी धावसंख्या उभारत विजय साकारला. त्यानंतर त्यांनी गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सला धूळ चारली. ट्रॅव्हिस हेड, हेनरिच क्लासेन, एडन मार्करम व अभिषेक शर्मा यांच्या बॅटमधून धावा निघत आहेत. हे चारही फलंदाज प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर आक्रमण करीत हैदराबादच्या धावसंख्येत मोलाची भर घालत आहेत. पंजाबकडेही आक्रमक फलंदाजी करणारे खेळाडू आहेत.

कर्णधार शिखर धवन, जॉनी बेअरस्टो व लियाम लिव्हिंगस्टोन यांच्यामध्ये सामन्याला कलाटणी देणारी फलंदाजी करण्याची क्षमता आहे; पण धवनवगळता इतरांना सातत्यपूर्ण फलंदाजी करता आलेली नाही. शशांक सिंगने गुजरातविरुद्धच्या लढतीत नेत्रदीपक खेळी साकारत पंजाबला संस्मरणीय विजय मिळवून दिला. आता शशांकप्रमाणे जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग या भारतीय खेळाडूंनीही तोडीसतोड खेळ करायला हवा.

IPL 2024 SRH vs PBKS
IPL मध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक धावा काढणारे टॉप-3 क्रिकेटर

अर्शदीप, हर्षलला सूर गवसेना

पंजाबच्या गोलंदाजांना अखेरच्या षटकांमध्ये चमक दाखवता आलेली नाही. अर्शदीप सिंग व हर्षल पटेल यांचे अपयश त्यांना बोचणी देणारे ठरत आहे. फिरकी गोलंदाज राहुल चहर याच्या गोलंदाजीवरही धावांची लूट करण्यात येत आहे. पंजाबसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे कागिसो रबाडा आपली कामगिरी चोख बजावत आहे.

कमिन्स चमकतोय; पण...

हैदराबादच्या संघातील गोलंदाजांना सुरुवातीला धमक दाखवता आलेली नाही. भुवनेश्‍वरकुमारचा अनुभव या वेळी मदतीला धावून आलेला नाही. भुवीसह जयदेव उनाडकट, मयांक मार्कंडे यांच्याकडून निराशा झालेली आहे. कर्णधार पॅट कमिन्स याने चार सामन्यांमधून पाच विकेट मिळविले आहेत; पण इतर गोलंदाजांकडून त्याला सहकार्य मिळालेले नाही.

अखेरच्या लढतीत विजय

पंजाब व हैदराबाद या दोन्ही संघांनी आतापर्यंत चार लढतींमधून दोन सामन्यांत विजय संपादन केले असून दोन सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही संघांना अखेरच्या लढतीत विजय मिळवता आलेला आहे. पंजाबने गुजरातला, तर हैदराबादने चेन्नईला नमवले आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीत दोन्ही संघ आत्मविश्‍वासाने मैदानात उतरतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()