IPL 2024 SRH Captain : सनराईजर्स हैदराबाद कर्णधार बदलणार; सलग दोन विजेतेपदं जिंकून दिली तरी मार्करमची होणार गच्छंती?

IPL 2024 SRH : हैदराबाद नव्या हंगामात देणार नवं नेतृत्व. व्हिटोरीशी केमेस्ट्री चांगली असण्याचा कांगारूंच्या कर्णधाराला होणार का फायदा?
IPL 2024 SRH
IPL 2024 SRHESAKAL
Updated on

IPL 2024 Sunrisers Hyderabad Captain : सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार एडिन मार्करमने संघाला दक्षिण आफ्रिका टी20 चे दोनवेळा विजेतेपद जिंकून दिलं आहे. असं असलं तरी आयपीएलमध्ये मार्करमचे कर्णधारपद जाऊ शकते. सनराईजर्स हैदराबादने लिलावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला 20.50 कोटी रूपये देऊन संघात घेतलं आहे. हैदराबाद त्यालाच 2024 मधील हंगामात संघाचं नेतृत्व करण्यास सांगण्याची शक्यता आहे.

IPL 2024 SRH
India vs Pakistan Ticket : कहरच झाला! भारत - पाकिस्तान सामन्याच्या सर्वात स्वस्त तिकीटाची किंमत पोहचली लाखाच्या घरात

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालीच गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाने अॅशेस राखल्या, वर्ल्डकप टेस्ट चॅम्पियनशिपवर देखील नाव कोरलं आणि भारतात झालेला वनडे वर्ल्डकप देखील जिंकला होता. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार सनराईजर्स हैदराबाद पॅट कमिन्सला आपला कर्णधार घोषित करू शकते. (Cricket Marathi News)

हा बदल हैदराबादचा गेल्या दोन हंगामातील कामगिरी पाहून केला जाऊ शकतो. तसेच पॅट कमिन्सचे आणि डॅनियल व्हिटोरीचे इक्वेशन पाहता हा निर्णय घेतला जाऊ शकतो. व्हिटोरी हा सध्या ऑस्ट्रेलियाचा सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक आहे. तर हैदराबादचा मुख्य प्रशिक्षक आहे.

IPL 2024 SRH
Usman Khawaja : ऑस्ट्रेलियाचा सलामीवर पुन्हा सापडला वादाच्या भोवऱ्यात! चालू कसोटी सामन्यात केलं 'हे' कृत्य

सध्या हैदराबादचे नेतृत्व एडिन मार्करमकडे आहे. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन हंगामात हैदराबादला फार यश मिळालेलं नाही. 2022 मध्ये हैदराबाद आठव्या तर 2023 मध्ये 10 व्या स्थानावर होते. मात्र मार्करमच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा संघ SA20 स्पर्धेतही खेळतो तेथे सनराईजर्स इस्टर्न केपने 2023 अन् 24 असे सलग दोन हंगाम जिंकले आहेत.

डेल स्टेन घेणार ब्रेक

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा सनराईजर्स हैदराबादचा प्रशिक्षक आहे. मात्र तो आयपीएल 2024 च्या हंगामातून ब्रेक घेणार आहे. मात्र तो पुढच्या हंगामात पुन्हा सनराईजर्स हैदराबादशी जोडला जाणार आहे.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.