Virat Kohli : विराट कोहलीने 'या' खेळाडूंचा केला सीता अन् गीता म्हणून उल्लेख, पाहा VIDEO

Virat Kohli : आयपीएलच्या १७ व्या हंगामात या तिघांमधील वाद मिटलेला दिसत आहे. कोलकत्ताविरुद्धच्या सामन्यात गौतम गंभीरने विराटला मिठी मारली आणि त्यांच्यात सर्व काही ठीक असल्याची चिन्ह यावरुन प्रेक्षकांना दिसत आहेत.
Virat Kohli
Virat Kohliesakal
Updated on

IPL 2024: राॅयल चॅलेंजर्स बँगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीचे आणि वाद-विवादांचे फार जूने नाते आहे. कोहलीचा आयपीएलमध्ये कोणत्या ना कोणत्या खेळाडूशी वाद होतच असतो. आयपीएल २०२३ मध्ये कोहलीचा आणि नवीन उल हकचा वाद इतक्या प्रमाणात वाढला होता कि गौतम गंभीरला सुद्धा मधे पडावे लागले होते. त्यानंतर विराट आणि गौतम गंभीर एकमेकांना भिडले होते.

आयपीएलच्या १७ व्या हंगामात या तिघांमधील वाद मिटलेला दिसत आहे. कोलकत्ताविरुद्धच्या सामन्यात गौतम गंभीरने विराटला मिठी मारली आणि त्यांच्यात सर्व काही ठीक असल्याची चिन्ह यावरुन प्रेक्षकांना दिसत आहेत. तसेच विराटने नविनला सुद्धा मिठी मारली होती. एका कार्यक्रमादरम्यान कोहलीने गौतम गंभीर आणि नवीन उल हकच्या वादाबद्दल खुलासा केला आहे.

विराट कोहलीने म्हटले आहे की, "लोक माझ्या वागणूकीवरुन खुप नाराज होत आहेत. मी नवीनला मीठी मारली, त्याच दिवशी गंभीरने सुद्धा मला मिठी मारली. त्यामुळे तूमचा मसाला आता संपला आहे."

२०२३ मध्ये झालेल्या विराट आणि नवीन यांच्यातील वादामुळे चाहते नविनवर नाराज होते. एकदिवसीय विश्वचषकावेळीच त्या दोघांमधील वाद संपला होता. याबद्दल बोलताना नविन म्हणाला होता कि, "त्याने माझ्या सोबतचा वाद संपवण्याचा आग्रह केला होता. मी सुद्धा म्हणालो की चला हा वाद इथेच संपवूया. आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि पुढे निघालो. त्यांनी एस सुद्धा म्हंटल होत की यानंतर तुला माझ नाव ऐकायला नाही येणार फक्त प्रेक्षकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येईल."

Virat Kohli
Jasprit Bumrah IPL 2024 : ....तर जसप्रीत बुमराह 2024 चा टी 20 वर्ल्डकप कॅनडाकडून खेळला असता?

कोण आहे भारतीय संघाची सीता-गीता ?


विराट कोहलीने या कार्यक्रमादरम्यान भारतीय संघाच्या सीता-गीतावरुन सुद्धा चर्चा केली. त्याने अशा दोन खेळाडूंचा खुलासा केला आहे जे एकमेकांशिवाय राहु शकत नाहीत. विराटने गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि ईशान किशनला भारतीय संघाच्या सीता-गीता म्हणून संबोधित केले आहे.

विराट म्हणाला कि, "सीता आणि गीता (इशान आणि शुभमन) खुप मजेशीर आहेत. मला पण माहित नाही कि काय होतय परंतु हे दोघे कोणत्याही टूर दरम्यान एकटे राहत नाहीत. जर आम्ही खाण्यासाठी बाहेर निघालो तर ते एकसाथ येतात, चर्चा सुरु असताना सुद्धा ते एकसाथच असतात. मी त्यांना कधीच एकटे पाहिले नाही."

विराट कोहली आयपीएल २०२४ मध्ये ऑरेंज कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने ५ सामन्यांत १०५.३३ च्या सरासरीने ३१६ धावा केल्या आहेत. आरसीबी आपला सहावा सामना आज (गुरुवारी) मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. आरसीबी संघ आपल्या एका विजयासह गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे.

Virat Kohli
Virat Kohli MI vs RCB : वाटलं नव्हतं दोघंच सीनियर राहू... विराटने रोहितसोबतच्या 15 वर्षांच्या आठवणींना दिला उजाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.