MS Dhoni - Virat Kohli
MS Dhoni - Virat KohliSakal

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

MS Dhoni - Virat Kohli: चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाल्यानंतर धोनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेला होता. त्यानंतर विराट चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये गेल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Published on

MS Dhoni - Virat Kohli: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 68 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 27 धावांनी पराभवाचा सामोरे जावे लागले. या पराभवासह चेन्नईचे आयपीएल 2024 मधील आव्हानही संपले.

दरम्यान, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी बंगळुरूला चेन्नईविरुद्ध 18 धावांनी विजय मिळवणे गरजेचे होते. त्यामुळे बंगळुरूने 27 धावांनी विजय मिळवल्याने त्यांच्या प्लेऑफमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.

या विजयानंतर बंगळुरू संघ सेलीब्रेशन करत असताना चेन्नई सुपर किंग्स संघ हस्तांदोलनासाठी थांबला होता. पण याचदरम्यान आधीच निराश असलेल्या चेन्नई संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी काहीकाळ थांबल्यानंतर बंगळुरू संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच मागे फिरला.

MS Dhoni - Virat Kohli
Rohit Sharma : खासगी संभाषण उघड करणाऱ्या आयपीएल ब्रॉडकास्टरवर रोहितनं काढला जाळ

धोनीने कर्णधार ऋतुराज गायकवाडला हस्तांदोलनावेळी नेतृत्व करण्यास सांगितले. यादरम्यान, परत ड्रेसिंग रुममध्ये जाताना त्याने बंगळुरूच्या काही सदस्यांशी हात मिळवला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

याचदरम्यान आता धोनी ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतरच्या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओपासून अनेक चाहत्यांनी कयास लावला आहे की धोनी न दिसल्याने बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याला शोधत चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला.

त्यामुळे काहींनी विराटच्या खिलाडूवृत्तीचे कौतुकही केले आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की विराट कोहली काहीतरी शोधत असल्यासारखा दिसत आहे. त्यानंतर तो चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये जाताना दिसत आहे.

धोनी आणि विराट यांच्यात मैदानाबाहेरही चांगली मैत्री आहे. अनेकदा याबाबत विराटनेही भाष्य केले आहे. विराटने भारताकडून धोनीच्या नेतृत्वात पदार्पण केले होते. तसेच हे दोघेही एकमेकांच्या नेतृत्वात खेळले असल्याने त्यांच्यात चांगले बाँडिंग आहे.

MS Dhoni - Virat Kohli
IPL 2024: प्लेऑफमधील प्रवेशानंतर RCB चाहत्यांचे स्टेडियमबाहेर CSK समर्थकांबरोबर गैरवर्तन? सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

दरम्यान, बंगळुरूने पाँइंट्स टेबलमधील चौथे स्थान पक्के केले आहे. त्यामुळे आता त्यांना एलिमिनेटरचा सामना खेळावा लागणार आहे.

68 व्या सामन्यात अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 35 धावांची गरज होती, तर प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी 17 धावांची गरज होती. त्यावेळी धोनीने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकारही ठोकला होता.

मात्र, तो दुसऱ्या चेंडूवर 25 धावांवर बाद झाला. त्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या यश दयालने शेवटच्या 4 चेंडूत चेन्नईला 1 धावच करू दिली. त्यामुळे 219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकात 7 बाद 191 धावाच करता आल्या.

चेन्नईकडून रचिन रविंद्रने 37 चेंडूत 61 धावांची खेळी केली. तसेच रविंद्र जडेजाने 22 चेंडूत 42 धावांची खेळी केली. बंगळुरूकडून गोलंदाजी करताना यश दयालने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी बंगळुरूने 20 षटकात 5 बाद 218 धावा केल्या होत्या. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. तसेच विराट कोहलीने 47 धावा केल्या, तर रजत पाटिदारने 41 धावांची खेळी केली. चेन्नईकडून गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने 2 विकेट्स घेतल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com