IPL 2025 Player Retention: आयपीएल 2024 चा हंगाम नुकताच संपुष्टात आला आहे. आता बीसीसीआय अन् आयपीएल फ्रेंचायजींना पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाचे वेध लागले आहेत. या लिलावात संघांमध्ये मोठे बदल होणार असून सर्व संघांचा चेहराच बदलणार आहे. मध्यंतरी फ्रेंचायजींनी रिटेन केल्या जाणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढवावी अशी मागणी केली होती. मात्र बीसीसीआय आपला जुना 3+1 फॉर्म्युलाच लागू करणार असल्याचं वृत्त येत आहे.
आयपीएल 2025 मध्ये भारताचे कोणते स्टार खेळाडू हे आपला संघ बदलतील आणि कोणते संघ आपल्या स्टार खेळाडूंना रिटेन करतील याची उत्सुकता लागून राहिली आहे. रोहित शर्माला मुंबई रिटेन करणार की तो दुसऱ्या संघाकडून खेळणार विराट कोहली अन् आरसीबीचं नातं अबाधित राहणार की तुटणार याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
यासाठी बीसीसीआय कोणती रिटेंशन पॉलिसी लागू करते यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. संघांना किती खेळाडू रिटेन करण्याची मुभा असेल यावर सर्व गणिते ठरणार आहेत. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय सध्या तरी आपला जुना 3+1 फॉर्म्युलाच कायम ठेवण्याची शक्यता आहे. यात संघांना तीन खेळाडूंना रिटेन करण्याची मुभा असेल अन् एका खेळाडूला राईट टू मॅच करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल गव्हर्निंग काऊन्सीलच्या अधिकाऱ्याने आयपीएल 2025 च्या लिलावात 6 ते 8 खेळाडू रिटेन करण्याची शक्यता नाकारली. तो म्हणाला की, 'रिटेंशन खेळाडूंची संख्या 6 ते 8 करण्यात आली, त्यानंतर राईट टू मॅचची मुभा देखील देण्यात आली तर लिलाव प्रक्रिया राबवणे हे मूर्खपणाचे ठरेल. लिलाव हा आयपीएलचा एक सुंदर भाग आहे. त्याचे महत्व कमी करून लीगमधील चांगलं कॉम्पिटिशन अबाधित राखणं शक्य होणार नाही.'
जुन्या 3+1 फॉर्म्युल्याचा एक तोटा मोठ्या फ्रेंचायजींना होण्याची शक्यता आहे. त्यांना आपल्या स्टार खेळाडूंना रिटेन करता येणार नाहीये. काही फ्रेंचायजींचा फॅन बेस हा त्या स्टार खेळाडूंमुळेच आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे विराट कोहली. त्याच्यामुळे आरसीबीचा इतका मोठा फॅन बेस आहे.
याबाबत बोलताना अधिकारी म्हणाला की, 'होय ही समस्या अनेक संघांना होणार आहे. मात्र आपण आयपीएलची तुलना ही युरोपीयन प्रीमियर लीगच्या क्लबशी करणं थोडं धाडसाचं ठरेल. युरोपीयन प्रीमियर लीगमध्ये जे झालं ते आयपीएलमध्ये इतक्या लवकर होईल असं वाटत नाही.'
'हे घडलं तरी ते काही आयपीएल संघांपुरतंच मर्यादित असेल. याला अजून वेळ आहे. जर असं घडावं असं वाटत असेल तर लिलाव प्रक्रिया रद्द करून ड्राफ्ट पद्धत अंमलात आणावी. खेळाडूंच्या हस्तांतरणाची पद्धत सुरू करावी. मला वाटतं लिलाव हा आयपीएलला एक वेगळा दर्जा प्राप्त करून देतं.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.