IPL 2025 Retention: ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर संघातून बाहेर; सर्व फ्रँचायझी रिटेन खेळाडूंना किती पैसे देणार?

IPL 2025 Retention Players Salary: आयपीएल २०२५ लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंना संघात रिटेन केले हे गुरुवारी अखेर स्पष्ट केले आहे. त्यानंतर खेळाडूंनी रिटेन केलेल्या खेळाडूंना किती रुपये मानधन देण्यात आलंय हे देखील समोर आले आहे.
IPL retention 2025
IPL retention 2025Sakal
Updated on

IPL 2025 Retention list: गुरुवारी ५ वाजेपर्यंत इंडियन प्रीमियर लीगमधील सर्व सक्रिय १० संघांना आगामी १८ व्या हंगामासाठी कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार हे जाहीर करायचे होते. सर्व संघांना जास्तीत जास्त ६ खेळाडूंना (५ कॅप आणि १ अनकॅप) रिटेन करता येणार होते.

६ पैकी ६ खेळाडू रिटेन केले, तर लिलावात राईट टू मॅच कार्ड संघांना वापरता येणार नाही, ६ पैकी जितके कमी खेळाडू ते रिटेन करतील, तितके राईट टू मॅच कार्ड फ्रँचायझींना लिलावात वापरता येणार आहेत.

दरम्यान, आता कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोनच संघांनी प्रत्येकी ६ खेळाडूंना संघात कायम केले आहे. तसेच सर्वात कमी दोनच खेळाडूंना पंजाब किंग्स संघाने रिटेन केले आहे.

IPL retention 2025
IPL 2025 Retention: हार्दिक पांड्याच राहणार मुंबईचा कर्णधार, तर ४६ खेळाडू संघात कायम; सर्व रिटेन खेळाडूंची संपूर्ण लिस्ट
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.