IPL Auction 2022: चहरच्या बोलीला सीएसकेचा फिनिशिंग टच; लावली विक्रमी बोली

IPL Auction 2022 Deepak Chahar back to Chennai Super kings with record break bidding
IPL Auction 2022 Deepak Chahar back to Chennai Super kings with record break bidding esakal
Updated on

बंगळुरू : आयपीएल 2022 लिलावात (IPL Auction 2022) चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super kings) रिलीज केलेले आपले एकापेक्षा एक भारी खेळाडू पुन्हा मिळवण्याचा सपाटाच लावला आहे. त्यांनी ब्राव्हो, उथप्पा, रायडू पाठोपाठ आता वेगवान गोलंदाज दीपक चाहरला (Deepak Chahar) देखील आपल्या गोटात खेचले. सीएसकेने दीपक चाहरसाठी तब्बल 14 कोटी रूपयांची बोली लावली. ही चेन्नईने आतापर्यंत एखाद्या खेळाडूवर लावलेली सर्वात मोठी बोली ठरली.

दीपक चहरसाठी पहिल्यांदा दिल्ली कॅपिल्स आणि सनरायजर्स हैदराबाद चुरशीने बोली लावत होते. त्यावेळी सीएसके धोनीसारखी (MS Dhoni) कूल होती. जेव्हा दीपक चहर 10 कोटीच्या पार गेला तेव्हा सीएसकेने (CSK) लिलावात उतरली. त्यांनी चहरची बोली 14 कोटीपर्यंत नेली. चहरवर बोली लावण्यात राजस्थान रॉयल्सने देखील रस दाखवला. मात्र अखेरीस चेन्नईने दीपक चहरची बोली 14 कोटीवर सफाईदारपणे जिंकली.

चेन्नई सुपर किंग्जने मेगा लिलावात आपल्या संघातील जुन्या खेळाडूंना परत आपल्या घरात आणण्यासाठी जोर लावला होता. मात्र त्यांच्या हातून फाफ ड्युप्लेसिस (Faf Du Plessis) सारखा तगडा फलंदाज आणि उत्तम फिल्डर निसटून गेला. त्याला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरने 7 कोटीला खरेदी केले. मात्र चेन्नईला ड्वेन ब्राव्हो आणि रॉबिन उथप्पा हे दोन खेळाडू परत मिळवण्यात यश आले. चेन्नईने रॉबिन उथप्पाला आपल्या गोटात खेचण्यात यश आले आहे. त्यानंतर चेन्नईचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होची देखील घरवापसी झाली.

IPL Auction 2022 Deepak Chahar back to Chennai Super kings with record break bidding
ह्यू खाली कोसळल्यानंतर आयपीएल लिलाव प्रक्रियेत मोठा बदल

चेन्नईने घरवापसीच्या मोहिमेत अजून एका अनुभवी खेळाडूचे नाव जोडले. अंबाती रायडूला देखील सीएसकेने पुन्हा खरेदी केले. त्याचबरोबर दीपक चहरसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादच्या संघर्षात उडी घेत चहरची किंमत 2 कोटीपवरून 14 कोटींवर नेली. अखेर चेन्नईने दीपक चहरला 14 कोटी रूपयाला खरेदी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()