IPL Auction: 203 खेळाडूंवर फ्रँचायझींकडून ₹ 5,49,70,00,000 बरसात

IPL Auction 2022 Live Updates
IPL Auction 2022 Live Updates Sakal
Updated on

IPL Auction 2022 Updates : आयपीएलच्या मेगा लिलावात जवळपास 600 खेळाडूंच्या नावाची नोंदणी झाली होती. यातील 203 खेळाडूंवर बोली लागली तर 87 खेळाडू अनसोल्ड राहिले. 10 फ्रँचायझींनी मिळून या लिलावात ₹5,49,70,00,000 रुपये खर्च केले. लिलावात बोली लागलेल्या खेळाडूंमध्ये 66 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. सुरेश रैना स्टिव्ह स्मिथ, शाकीब हसन, डेविड विले, एडम झम्पा आणि कॉलिन मुन्हा या स्टार खेळाडूंना कोणीही भाव दिला नाही.

आयपीएलच्या मेगा लिलावात पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्सने ईशान किशानवर लावलेली 15 कोटी 25 लाख ही सर्वोच्च बोली ठरली. पहिल्या दिवशी 74 खेळाडूंवर बोली लागली होती. यात 54 भारतीय तर 20 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. पहिल्या दिवशी 10 फ्रँचायझींनी मिळून 3,88,10,000 एवढी रक्कम खर्च केली होती. दुसऱ्या दिवशी भारताचा मध्यफळीतील फलंदाज अंजिक्य रहाणे, जयदेव उनादकट या भारतीय खेळाडूंवर बोली लागली. (IPL Auction 2022 Live Updates Ajinkya Rahane S Sreesanth Jaydev Unadkat Eoin Morgan Ishant Sharma Fray on Day 2)

IPL Auction 2022 Live Updates
IPL Auction : टॉप 10 महागडे खेळाडू; MI पेक्षा RCB नं खेळला भारी डाव!
IPL Auction 2022 Live Updates
IPL Auction : गुजरातमुळे Arjun Tendulkar ला 10 लाखाची लॉटरी!

दुसऱ्या फेरीत सुरेश रैना अनसोल्ड राहिला. अजूनही त्याच्याकडे संधी आहे. ज्या संघाचे 25 खेळाडू झालेले नाहीत त्यांच्यासाठी आणखी एक राउंड होईल. यात फ्रेंचायझी काही अनसोल्ड प्लेयरची निवड करतील. यातून रैना पुन्हा एन्ट्री करु शकतो.

पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिलेल्या डेविड मिलरसाठी गुजरात टायटन्सने मोजले 3 कोटी

मुंबई इंडियन्सनं 40 लाखाच्या अनकॅप्ड ऑल राउंडरला 8.25 कोटीत उचललं

  • CGआयपीएलच्या मेगा लिलावात महाराष्ट्रातल्या उस्मानाबादच्या हंगरगेकर झाला करोडपती, धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जन 30 लाख मूळ किंमत असलेल्या अनकॅप्ड प्लेयरसाठी मोजले दीड कोटी

  • अनकॅप्ट खेळाडूंवर दिल्लीनं लावला डाव

एन तिलक वर्मासाठी मुंबईनं मोजले 1.70 कोटी

दिल्ली कॅपिटल्सनं अंडर 19 वर्ल्ड कप चॅम्पियन यश धूलला 50 लाख रुपयात केलं खरेदी

रिपेल पटेलसाठीही दिल्लीनं लावला यशस्वी डाव, 20 लाखात बोली केली डन

ललित यादवसाठी दिल्लीनं मोजलं 65 लाख

रिकी भुवी अनसोल्ड

मनन वोहरासाठी लखनऊनं मोजले 20 लाख

कोलकातानां 55 लाखात रिंकूला घेतला आपल्या ताफ्यात

हिमांशू राणा अनसोल्ड

अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा ओपनर हरनूर सिंग अनसोल्ड

सचिन बेबी अनसोल्ड

हिमंत सिंग अनसोल्ड

पियूष चावला अनसोल्ड

न्यूझीलंड फिरकीपटू इश सोधी अनसोल्ड

करण शर्मा अनसोल्ड

शहाबाज नदीमसाठी लखनऊन पर्समधून काढले 50 लाख

अफगाणिस्तान स्पिनर कियास अहमद अनसोल्ड

तरबेज शम्सी अनसोल्ड

  • दुसऱ्या दिवशी शांत असलेल्या मुंबई इंडियन्सने जयदेव उनादकडला आपल्या ताफ्यात घेत दुसऱ्या दिवसातील पहिली खरेदी केली. त्याच्या पाठोपाठ त्यांनी मार्कंडेलाह 65 लाखात आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं

  • शिवम दुबे धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात, 4 कोटी मोजून घेतला विकत

  • वेस्ट इंडीज वोडेन स्मिथवरही 6 कोटीचा डाव, पंजाबने आणखी एक मोठी खेळी करत कॅरेबियनला घेतलं आपल्या ताफ्यात

  • सनरायझर्स हैदराबादनं मार्को जेनसनसाठी मोजले 4.2 कोटी

  • गुजरात टायटन्सनं विजय शंकरसाठी मोजले 1.40 कोटी

  • डॉमिनिक ड्रिक्ससाठी गुजरात टायटन्सनं मोजलं 1.10 कोटी

  • लियाम लिविंगस्टोनसाठी पंजाब किंग्जनं मोजलं 11.50 कोटी

  • मनदीपसाठी दिल्ली कॅपिटल्सनं मोजले 1.10 कोटी

अनसोल्ड प्लेयर्स

  • डेविड मलान, मार्नस लाबुशेन फिंच, इयॉन मॉर्गन,सौरभ तिवारी चेतेश्वर पुजारा अनसोल्ड

  • अजिंक्य रहाणे कोलकाताकडून खेळणार; 1 कोटीत सौदा पक्का

  • मार्करम पंजाबने लावली पहिली बोली; सनरायझर्सलाही तो आपल्यात हवा आहे. दोन्ही फ्रँचायझींमध्ये कांटे की टक्कर सुरु असताना मुंबई इंडियन्सची एन्ट्री, 1 कोटीचा गड्यासाठी हैदराबादनं मोडले 2.6 कोटी

  • दक्षिण आफ्रिकेच्या एडम मार्करमवर दुसऱ्या दिवसातील पहिली बोली

  • कोणता संघ कोणत्या खेळाडूवर लावणार मोठी बोली हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

दुसऱ्या दिवशीच्या लिलावावेळी कुणाच्या पर्समध्ये किती?

चेन्नई सुपर किंग्ज 20 कोटी 45 लाख

दिल्ली कॅपिटल्स 16 कोटी 50 लाख

गुजरात टायटन्स 18 कोटी 85 लाख

कोलकाता 12 कोटी 65 लाख

लखनऊ 6 कोटी 90 लाख

मुंबई इंडियन्स 27 कोटी 85 लाख

पंजाब किंग्ज 28 कोटी 65 लाख

राजस्थान 12 कोटी 15 लाख

रॉयल चॅलेंजर्स 9 कोटी 25 लाख

हैदराबाद 20 कोटी 15 लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.