IPL Auction: बटलरला आता मंकडिंग व्हावे लागणार नाही! कारण....

IPL Auction 2022 Rajasthan Royals brought Ravichandran Ashwin alongside his mankading wicket Jos Buttler aas86
IPL Auction 2022 Rajasthan Royals brought Ravichandran Ashwin alongside his mankading wicket Jos Buttler aas86 esakal
Updated on

बंगळुरू: आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Mega Auction 2022) सुरू आहे. या लिलावात राजस्थान रॉयल्सने भारताचा अव्वल फिरकीपटू आर. अश्विनला (R. Ashwin) आपल्या गोटात ओढले. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) अश्विनसाठी 5 कोटी रूपये मोजले. अश्विनची बेस प्राईस 2 कोटी होती. विशेष म्हणजे राजस्थानने मेगा लिलावापूर्वी इंग्लंडचा विकेटकिपर जोस बटलरला (Jos Buttler) रिटेन केले होते. त्यामुळे आता आयपीएलमधील गाजलेल्या मंकडिंग वादात सामिल असणारे दोन्ही खेळाडू एकाच संघात आले आहे. त्यामुळे आता अश्विन मंकडिंग पद्धतीने बाद करण्याची धास्ती बटलरला वाटणार नाही.

आयपीएलच्या 2019 च्या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या आर. अश्विनने राजस्थान बरोबरच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाज जोस बटरला मंकडिंग (Mankading) करून बाद केले होते. बटलरने अश्विन बॉल टाकण्याच्या आधीच क्रिज सोडली होती. त्याचा फायदा घेत अश्विनने त्याला बाद केले होते.

यावर बटलरने आक्षेप घेतला होता. मात्र नियमानुसार त्याला बाद ठरवण्यात आले. या घटनेनंतर क्रिकेट वर्तुळात खेळ भावनेबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र अश्विन आपल्या भुमिकेवर ठाम होता. त्याने मी जर फलंदाजाने अवैधरित्या पुन्हा क्रिज सोडली तर मी पुन्हा त्याला मंकडिंगद्वारे बाद करणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.