रात्रीत 'करोडपती' झाले क्रिकेटर; गावसकरांना का खुपलं?

IPL Auction 2022 Sunil Gavaskar On most expensive uncapped player
IPL Auction 2022 Sunil Gavaskar On most expensive uncapped playerSakal
Updated on

आयपीएलच्या मेगा लिलावात अनकॅप्ड खेळाडूंवर (Uncapped Indian Cricketers) पैशाची बरसात झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक फ्रँचायझींनी मोठी रक्कम खर्च करुन युवा खेळाडूंना (Uncapped Players) पसंती दिली. अनेक खेळाडू एका रात्रीत 'करोडपती' झाले. पण ही गोष्ट भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि लिटल मास्टर सुनील गावसकरांना (Sunil Gavaskar) जाम खटकली आहे. आयपीएल लिलावात अनकॅप्ड खेळाडूंवर बोली लावण्याची मर्यादा ही 1 कोटीपर्यंतच असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. एका रात्रीत सहज मिळणारी मोठी रक्कम युवा खेळाडूंच्या भविष्यावर परिणाम करणारी आहे. त्यामुळे क्षमता असलेले खेळाडू भरकटतात, असा तर्क गावसकरांनी लावला आहे. (IPL Auction 2022 Sunil Gavaskar On Most Expensive Uncapped Player)

आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी बंगळुरुमध्ये मेगा लिलाव (IPL Mega Auction) प्रक्रिया पार पडली. या मेगा लिलावासंदर्भात गावसकरांनी Mid-Day ला एक लेख लिहिला आहे. यात त्यांनी लिहिलंय की, मेगा लिलावात डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत अंडर 19 खेळाडूंवर कोट्यवधीची बोली लागली. 19 वर्षाखालील स्तरावर केलेल्या कामगिरीच्या जोरावर आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळत नाही. गेल्या काही वर्षांपासून आपण हे पाहिलेल आहे. आयपीएल आणि आतंरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी यात खूप अंतर आहे.

IPL Auction 2022 Sunil Gavaskar On most expensive uncapped player
IPL 2022 : अंबानी अँण्ड कंपनीचे 4 निर्णय; MI ला रडवणार? की...

अल्पावधीत मिळालेल्या भरमसाठ पैशामुळे अनेक खेळाडू भरकटतात. त्यांचा खेळावरील फोकस कमी होतो. त्यामुळे अनकॅप्ड खेळाडूंवर बोली लावण्यासाठी काही नियम करण्याची गरज आहे. अधिकाधिक 1 कोटींची बोलीची मर्यादा करायला हवी. तरच हे खेळाडू पुढे जाऊन आणखी कमाई करण्यासाठी मेहनत घेतील, असा उल्लेख गावसकरांनी आपल्या लेखात केला आहे. सहज मोठ्या प्रमाणात कमाईमुळे अनेक खेळाडू वाया गेले आहेत, असा दावाही त्यांनी केलाय. .

IPL Auction 2022 Sunil Gavaskar On most expensive uncapped player
VIDEO : रुक जाना नहीं; अनसोल्ड श्रीसंतला किशोरदांचा 'सहारा'

लाखभर रुपये बेस प्राइज असलेल्या या अनकॅप्ड खेळाडूंना मिळाले कोट्यवधी

  • आवेश खान ( Avesh Khan) (Base price Rs 20 lakh) लखनऊ सुपर जाएंट्सनं मोजले 10 कोटी

  • शाहरुख खान (Shahrukh Khan) (Base price Rs 40 lakh) - पंजाबने मोजले 9 कोटी

  • राहुल तेवतिया Rahul Tewatia (Base price Rs 40 lakh) गुजरात टायटन्सने मोजले 9 कोटी

  • राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) (Base price Rs 40 lakh) सनरायझर्स हैदराबादनं दिले 8.50 कोटी

  • टीम डेविड (Tim David) (Base price Rs 40 lakh) - मुंबई इंडियन्सनं मोजले 8.25 कोटी

  • शिवम मावी ( Shivam Mavi) (Base price Rs 40 lakh) - कोलकता नाईट रायडर्सने मोजले 7.75 कोटी अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) (Base price Rs 40 lakh) - सनरायझर्सने मोजले 6.5 कोटी

  • कार्तिक त्यागी Kartik Tyagi (Base price Rs 20 lakh) सनरायझर्सने मोजले 4 कोटी

  • रियान पराग (Riyan Parag) (Base price Rs 30 lakh) - राजस्थानने मोजले 3.8 कोटी

  • हरप्रीत ब्रार (Base price Rs 20 lakh) पंजाबनं मोजले 3.8 कोटी

  • अनुज रावत Anuj Rawat (Base price Rs 20 lakh) - बंगळुरुनं मोजले 3.40 कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.