टीम इंडियातील स्टार खेळाडूंसाठी अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धा नेहमीच मोठं व्यासपीठ राहिलं आहे. मोहम्मद कैफ, युवराज सिंग या स्टार खेळाडूंपासून ते किंग विराट कोहली रविंद्र जाडेजा यासारखे तगडे खेळाडू भारतीय संघाला याच स्पर्धेतून मिळाले. ईशान किशन, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, यशस्वी जयस्वावाल, प्रियम गर्ग, कमलेश नागरकोटी या अंडर 19 स्टार्स देखील गेल्या काही हंगामापासून स्पर्धा गाजवताना दिसत आहेत. (IPL Auction 2022 Yash Dhull To Dewald Brevis 4 Under 19 world cup Players expensive In Auction)
यंदाच्या अंडर 19 वर्ल्ड कप 2022 (Under 19 world cup) स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करणारे काही खेळाडू टीम इंडियात (Team India) स्थान मिळवू शकतात. त्याआधी त्यांच्यासाठी आयपीएलच्या माध्यमातून नवे आणि मोठे व्यासपीठ मिळणार आहे. भारतीय संघाने विक्रमी पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. या संघातील अनेक खेळाडूंवर मेगा लिलावात मोठी बोली लागू शकते. या यादीत एक परदेशी खेळाडूही असून तोही मालामाल होऊ शकतो. जाणून घेऊयात अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील असे खेळाडू ज्यांच्यावर मेगा लिलावात पैशांची बरसात होऊ शकते.
राज बावा (Raj Angad Bawa)
वर्ल्ड कप फायनलमध्ये राज अंगद बावा (Raj Angad Bawa) याने मॅन ऑफ द मॅच मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने या स्पर्धेत 6 सामन्यात 252 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीत त्याने एका 5 विकेट घेण्याचा पराक्रमासह एकूण 9 विकेट घेतल्या. आयपीएलच्या मेगा लिलावात त्याच्या नावाचाही समावेश आहे. मूळ किंमत 20 लाख असलेल्या हरहुन्नरी पोरावर लिलावात मोठी बोली लागू शकते. राज याने युगांडा विरुद्धच्या सामन्यात स्पर्धेतील सर्वोच्च 162 धावांची खेळी केली होती.
यश धूल (Yash Dhull)
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केलेल्या यश धूलही (Yash Dhull) आगामी मेगा लिलावात सहभागी असेल. यशनं 4 सामन्यात 229 धावा कुटल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये त्याने शतकी खेळीसह विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्याच्यावही मोठी बोली लागली तर नवल वाटणार नाही.विक्की ओस्तवाल
विक्की ओस्तवाल (Vicky Ostwal)
अंडर-19 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेतील 6 सामन्यात 12 विकेट घेणाऱ्या विक्की ओस्तवालनं लक्षवेधून घेतलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामी लढतीत युवा मिस्ट्री स्पिनरनं आपल्या फिरकीन प्रतिस्पर्धी फलंदाजांना नाचवलं. त्याने 28 धावा खर्च करुन 5 विकेट घेतल्या होत्या. तोही मेगा लिलावात 20 लाख या मूळ किंमतीसह सहभागी आहे. त्याच्यावरही चांगली बोली लागू शकते.
डेवाल्ड ब्रेविस (dewald brevis)
अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविस याने कमालीची कामगिरी करुन दाखवली. आफ्रिकेचा संघ फायनलपर्यंत पोहचला नसला तरी या युवा खेळाडूनं स्पर्धा गाजवली. त्याने 6 सामन्यात 506 धावा केल्या. 2003-04 मध्ये शिखर धवनने 505 धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडीत काढणाऱ्या डेवाल्डची तुलना ही एबी डिव्हिलियर्ससोबत होत आहे. मेगा लिलावमध्ये त्याच्या नावाचाही समावेश आहे. 20 लाख मूळ किंमत असली तरी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी त्याला मालामाल करु शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.