IPL 2024 Auction : लिलावाच्या काही तास आधी मोठी बातमी... 'या' 3 स्टार खेळाडूंनी आपली नावे घेतली मागे

IPL 2024 Auction Updates
IPL 2024 Auction Updates
Updated on

IPL 2024 Auction Updates : इंडियन प्रीमियर लीगसाठी मिनी लिलाव आज (19 डिसेंबर) दुबई येथे होणार आहे. हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होईल, ज्यामध्ये 215 अनकॅप्ड खेळाडूंसह एकूण 333 खेळाडूंवर बोली लावली जाईल. मात्र या लिलावाच्या काही तास आधी मोठी बातमी समोर आली आहे.

IPL 2024 Auction Updates
SA vs IND 2nd ODI : दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियात मोठा बदल; दिग्गज खेळाडू बाहेर, 'या' स्टार मिळणार संधी?

इंग्लंड संघाचा स्टार लेगस्पिन अष्टपैलू खेळाडू रेहान अहमदने आयपीएल लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे. त्यांच्याशिवाय बांगलादेश संघाचे स्टार वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि शौरीफुल इस्लाम यांनीही आयपीएल लिलावातून आपली नावे मागे घेतली आहेत.

ESPNcricinfo नुसार, मिस्ट्री स्पिनर रेहानने शॉर्ट नोटिस दिल्यानंतर त्याचे नाव मागे घेतले आहे. इंग्लंड संघ 22 ते 30 मे दरम्यान घरच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. पण इंग्लंड बोर्डाने सांगितले की त्यांचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध असतील.

इंग्लंड संघातील हॅरी ब्रूक, फिल सॉल्ट, ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद या स्टार खेळाडूंचा लिलावात समावेश आहे. पण दरम्यान, 19 वर्षीय रेहानने आयपीएल लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे.

IPL 2024 Auction Updates
रोहितला MI ने हटवल्यानंतर खेळाडूंमध्ये नाराजी? बुमराह अन् सूर्या नंतर 'या' खेळाडूचा डीपी चर्चेत

दुसरीकडे बांगलादेश संघाचे स्टार वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि शौरीफुल इस्लाम यांनीही आयपीएल लिलावातून आपली नावे मागे घेतली आहेत. याचे कारण म्हणजे बांगलादेशला मार्च आणि एप्रिलमध्ये घरच्या मैदानावर श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत हा खेळाडू आयपीएल खेळू शकणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.